Home /News /money /

Financial Year : 31 मार्च आधी 'ही' पाच कामं करुन घ्या, नाहीतर मोठं नुकसान होईल

Financial Year : 31 मार्च आधी 'ही' पाच कामं करुन घ्या, नाहीतर मोठं नुकसान होईल

आयकर नियोजन (Income Tax Planning) सर्वात महत्त्वाचे आहे. 31 मार्च 2022 पर्यंत आयकराशी संबंधित सर्व काम पूर्ण झाले नाही, तर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो.

    मुंबई, 15 मार्च : आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला आता काही दिवस उरले आहेत. यामुळेच आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कोणतेही काम अपूर्ण राहू नये. विशेषत: आयकर नियोजन (Income Tax Planning) यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. 31 मार्च 2022 पर्यंत आयकराशी संबंधित सर्व काम पूर्ण झाले नाही, तर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो.  इनकम टॅक्स रिटर्न जर तुम्ही अद्याप 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरला नसेल, तर तुम्ही ते 31 मार्च 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत सुधारित आयटीआर देखील दाखल करता येईल. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काही दुरूस्ती असली तरी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. यानंतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. Income Tax Alert : सोन्यातील गुंतवणुकीवर कर कसा आकारला जातो? डिटेल्स चेक करा करबचत गुंतवणूक 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर सवलत मिळवण्यासाठी, 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करा. याचा अर्थ, कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, ज्यातून तुम्हाला कर सवलत मिळू शकते. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी यासारख्या लहान बचत योजनांचा समावेश आहे. तसेच, तुम्ही एलआयसीचा हप्ता भरून कर वाचवू शकता. याशिवाय इतर आयकर लाभ घेण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. अॅडव्हान्स टॅक्स आयकर कायदा 208 अंतर्गत, 10,000 रुपयांपेक्षा जास्त करदायित्व असलेले करदाते आगाऊ कर (Advance Tax) भरू शकतात. तो 4 हप्त्यांमध्ये देऊ शकतो. तुम्ही शेवटचा हप्ता 15 मार्चपर्यंत जमा करू शकता. Senior Citizen Saving Scheme : 31 मार्च आधी बचत खाते लिंक करा, अन्यथा रोख व्याज मिळणार नाही आधार आणि पॅन कार्ड लिंक आधार आणि पॅन कार्ड लिंक (Aadhar-PAN Link) करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड अजून लिंक केले नसेल तर लवकरच लिंक करा. लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल आणि तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. चुकून डिअॅक्टिव्हेटेड पॅन कार्ड कुठेतरी वापरले गेले, तर मोठा दंडही होऊ शकतो. एकापेक्षा जास्त जागी वापरल्यास दंड तसेच शिक्षेची तरतूद आहे. बँक खात्याचे केवायसी जर तुमचे बँक खाते असेल आणि तुम्ही अद्याप बँक खात्याचे केवायसी (Bank Account KYC) केले नसेल तर ते आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी करा. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2021 होती परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख वाढवण्यात आली होती. आता तुमचे केवायसी 31 मार्चपर्यंत पूर्ण झाले नाही तर तुमचे आर्थिक व्यवहार थांबतील. तुम्ही आयकर परतावा घेऊ शकणार नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Financial benefits, Income tax

    पुढील बातम्या