मुंबई, 15 जुलै: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Dr. Shivajirao Patil Nilangekar Urban Co-operative Bank Ltd.) बँकिंग परवाना (Canceled Banking License) रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे बँकेचा परवानाच रद्द झाल्याने आता बँक ठेवीदारांना पैसे देण्यास असमर्थ होईल. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत. हे वाचा- या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव DA, वाचा या निर्णयासंदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे बँकेकडे नाही आहे कमाईचं साधन आरबीआयने अशी माहिती दिली आहे की सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. हे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार नाही. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ग्राहकांसाठी सुरू राहणं योग्य नाही. बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होईल. हे वाचा- Mastercard वर RBI ने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार? महिनाभरापूर्वी रद्द केलं होता या बँकेचा परवाना महिनाभरापूर्वी आरबीआयने पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला होता. आरबीआयने बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 चे कलम -35A अंतर्गत या बँकेवर निर्बंध आणले होते. याअंतर्गत बँकेतून पैसे काढणे, जमा करणे, कर्ज देणे या व्यवहारांवर निर्बंध आणले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.