जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Mastercard वर आरबीआयने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार?

Mastercard वर आरबीआयने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार?

Mastercard वर आरबीआयने आणली बंदी, तुम्ही हे कार्ड वापरत असाल तर काय परिणाम होणार?

आरबीआयने (RBI) मास्टरकार्डला 22 जुलै 2021 पासून त्यांच्या नेटवर्कमध्ये देशांतर्गत नवीन ग्राहकांना समाविष्ट करण्यास बंदी आणली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 जुलै: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बँकांकडून जारी करण्यात येणाऱ्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्डबाबत बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. 14 जुलै रोजी आरबीआयने मास्‍टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीई लिमिटेड (मास्टरकार्ड) विरोधात मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय बँकेने मास्‍टरकार्डला (Mastercard) 22 जुलै 2021 पासून त्यांच्या नेटवर्कमध्ये देशांतर्गत नवीन ग्राहकांना समाविष्ट करण्यास बंदी आणली आहे. काही नियमांचं पालन न केल्यामुळे ही बंदी आणण्यात आली आहे. RBI ने का आणली ही बंदी? आरबीआयने ही कारवाई पेमेंट सिस्टिम डेटाच्या स्थानिक स्टोरेजच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणली आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, अधिक वेळ आणि अनेकदा संधी देऊनही मास्टरकार्डने पेमेंट सिस्टिम डेटाच्या स्थानिक स्टोरेज संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन केले नाही.

जाहिरात

रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्डला अशी माहिती दिली आहे की, त्यांच्याकडून सर्व कार्ड जारी करणाऱ्या सर्व बँका आणि गैर बँकिंग संस्थांना या आदेशाबाबत सूचना दिली जाईल. आरबीआयने मास्टरकार्ड विरोधात ही सुपरव्हायझरी कारवाई पेमेंट अँड सेटलमेंट कायदा 2007 च्या कलम 17 अंतर्गत करण्यात आली आहे. हे वाचा- Gold Price Today: सोन्याचा भाव 47 हजारांच्या पार, चांदीची झळाळी मात्र उतरली सध्याच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम नाही RBI ने अशी माहिती दिली आहे की या आदेशानंतर मास्टरकार्ड वापरणारे जे सध्याचे ग्राहक आहेत त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मास्टरकार्डला पीएसएस कायद्याअंतर्गत देशामध्ये कार्ड नेटवर्कचं संचालन करण्यासाठी पेमेंट सिस्टम ऑपरेटर म्हणून मंजुरी देण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात