मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI MPC Meeting : महागाईवर नियंत्रण पण तरीही RBI वाढवू शकतो रेपो रेट, जाणून घ्या कारण

RBI MPC Meeting : महागाईवर नियंत्रण पण तरीही RBI वाढवू शकतो रेपो रेट, जाणून घ्या कारण

RBI

RBI

RBI MPC Meet On Repo Rate Hike and Inflation : मॉनेटरी पॉलिसीसंदर्भात आजपासून RBI ची तीन दिवस महत्त्वपूर्ण बैठक, EMI वर 8 फेब्रुवारीला निर्णय येण्याची शक्यता

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : बजेटनंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष RBI च्या मॉनेटरी पॉलिसीकडे आहे. महागाईवर अंशत: नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी या बैठकीत पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात. ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरकोळ महागाई कमी होत असताना पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चलनविषयक धोरण समिती रेपो रेटमध्ये वाढ करणार का हे पाहावं लागणार आहे. ही बैठक तीन दिवस चालणार आहे. MPC च्या बैठकीतील निर्णय 8 फेब्रुवारी रोजी सांगितला जाण्याची शक्यता आहे.

एकापेक्षा जास्त बँक खाती ठरू शकतात अडचणीची? काय सांगतो RBI चा नियम

US फेडरल रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 25 बेसिस पॉईंट्सने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तिथल्या कर्जदारांवर अतिरिक्त EMI चा भार वाढला आहे. याचे परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळाले. ही दरवाढ आठव्यांदा करण्यात आली आहे.

तज्ज्ञांचे असे मत आहे की या आठवड्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यात मध्यवर्ती बँक रेपो दरात किरकोळ 25 बेसिस पॉईंट्सने वाढ करू शकते. डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. त्याच वेळी, याआधी सलग तीन वेळा रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

KYC Updates : तुमच्या कामाची बातमी! KYC बाबत RBI कडून मोठी अपडेट, लगेच चेक करा

आतापर्यंत RBI ने पाचवेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सादर केलेल्या अहवालानुसार, जागतिक चलनवाढीचा दर कमी होत आहे, तरीही चलनवाढीचा दर प्रत्येक मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. पुढील काही महिन्यांत महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

सहा महिन्यांपर्यंत ही दरवाढ होईल त्यानंतर स्थिर राहण्याची शक्यता आहे. यानंतर, 2023 च्या उत्तरार्धात किंवा 2024 च्या सुरुवातीला दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. मात्र त्यावेळच्या स्थितीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील असंही म्हटलं आहे.

तुमची बँक सुरक्षित आहे की नाही? RBI चे गव्हर्नर काय म्हणाले पाहा

First published:

Tags: EMI, Rbi, Rbi latest news, Repo rate