मुंबई : आपल्यापैकी अनेकांचं बँकेत अकाउंट असेल. खरं तर आजच्या काळात बँक अकाउंट असणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. देशातील कोट्यवधी लोकांची बँक खाती आहेत, अनेकांची तर वेगवेगळ्या बँकांमध्ये एकापेक्षा जास्त खाती असतात.
जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये तुमची खाती उघडली असतील तर तुमच्यासाठी अडचण ठरू शकते. होय, आणि याबाबत आरबीआयच्या वतीने ग्राहकांना माहिती देण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त खाती असलेल्यांसाठी आरबीआयने नवे नियम जारी केले आहेत. ते नियम कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
आरबीआयने एका व्यक्तीची किमान किंवा कमाल किती खाती किती असावीत किंवा एखाद्या व्यक्तीने किती खाती उघडावी याबद्दल कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. परंतु एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती ठेवल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
New Year : जानेवारी महिन्यात 14 दिवस बंद राहणार बँक, पाहा संपूर्ण लिस्ट
तसेच तुम्हाला सर्व खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स मॅनेज करावं लागतं. यासोबतच इतर अनेक सुविधाही मॅनेज कराव्या लागतात. चेकबुकपासून कार्डापर्यंत सर्व काही तुम्हाला हाताळावं लागतं, त्यामुळे जास्त अकाउंट असले की ते सांभाळण्याचा त्रासही वाढतो.
याशिवाय तुम्हाला मेंटेनन्ससह अनेक प्रकारचे चार्जेसही द्यावे लागतात. क्रेडिट आणि डेबिट कार्ड चार्जेस, सर्व्हिस चार्जेससह विविध प्रकारचे पेमेंट करावे लागते. त्यामुळे जर तुम्ही फक्त एकाच बँकेच्या सुविधांचा लाभ घेतला तर तुम्हाला फक्त एकाच बँकेत हे सर्व चार्जेस भरावे लागतील, तुमचा अतिरिक्त खर्च वाचेल.
सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्याला फोन, मेसेज केल्यास एक लाख रुपये दंड; `या` कंपनीची अनोखी पॉलिसी
यासोबतच अनेक बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 5000 रुपये तर अनेक बँकांमध्ये 10,000 रुपये दंड भरावा लागत असल्याचं दिसून येत आहे. तुम्ही ते बॅलन्स मॅनेज न केल्यास तुमचा CIBIL स्कोअरही खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे जास्त अकाउंट असली की त्यांच्या मेंटनन्ससाठी जास्त खर्च होतो.
तुम्ही वापरत नसलेली तुमची सर्व खाती बंद करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. बँकेच्या शाखेत जाऊन तिथे क्लोजर फॉर्म मागून तुम्ही ते अकाउंट बंद करू शकता, असं आरबीआयने सांगितलं आहे.
नवीन वर्षात पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करून मिळवा जास्त उत्पन्न
दरम्यान, जास्त बँक खाती ही खर्च वाढवणारी असतात. तुम्हाला गरज नसतील ती बँक खाती बंद करून तुम्ही त्या अकाउंट मेन्टनन्सचे चार्जेस वाचवू शकता. तसंच ते अकाउंट सांभाळण्याचं तुमचं कामही वाचेल. म्हणून तुम्हाला गरज असेल तितकीच बँक खाती वापरा. त्यापेक्षा जास्त असतील ती बँकेत जाऊन बंद करून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Rbi, Rbi latest news