मुंबई : ही बातमी तुमच्या कामाची आणि अत्यंत महत्त्वाची आहे. KYC संदर्भात RBI ने नवीन नियम जारी केले आहेत. त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत. KYC करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी बँकेत तुमच्या ओरिजनल कागदपत्रांसोबत हजर राहावं लागतं. मात्र आता तसं करण्याची गरज नसेल असं पहिल्यांदाच RBI कडून सांगण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांसाठी नवीन केवायसीसंदर्भातील महत्त्वाची सूचना ग्राहकांना दिली आहे. तुम्हाला आता KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला नवीन केवायसी करायची असेल किंवा जर तुमचे कागदपत्र मॅच होत नसतील तर तुम्हाला पुन्हा KYC करायला लागू शकते.
यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. तुम्ही रि-केवायसी ऑनलाईन करू शकतात. मात्र, ऑनलाइन रि-केवायसीमध्ये ग्राहकांना काही अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
एकापेक्षा जास्त बँक खाती ठरू शकतात अडचणीची? काय सांगतो RBI चा नियम
रि केवायसी कसं करायचं?
RBI ने दिलेल्या आदेशानुसार बँकेत तुमच्या KYC चे अपडेट काही कालावधीनंतर अपडेट करण्यासाठी बँकेकडून सांगितलं जातं. तुमचं खातं सुरक्षित राहावं हा यामागचा उद्देश असतो. अशावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला बँकेत जाऊन कागदपत्र दाखवून KYC करण्याची आवश्यकता भासणार नाही.
पहिल्यांदाच तुम्ही KYC केलं असेल तर नंतर रि केवायसी करताना तुम्ही नेट बँकिंग किंवा तुम्ही बँकेत दिलेल्या Email चा वापर करू शकता. ग्राहक नोंदणीकृत ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनेल (उदा. ऑनलाइन बँकिंग/इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप्लिकेशन), लेटर्स इत्यादींचा वापर पुन्हा केवायसी करण्यासाठी करू शकतात, असं RBI ने म्हटलं आहे.
SBI ग्राहकांसाठी गुडन्यूज! तुमची अर्धी कामं होणार एक फोनवर
व्हिडीओ KYC
बऱ्याच बँकांनी आता व्हिडिओ केवायसीची सुविधा सुरू केली आहे. तुम्हाला जर व्हिडीओ KYC करायचं असेल तर, तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन व्हिडिओ केवायसीचा पर्याय निवडू शकता. तिथे हा पर्याय उपलब्ध असेल तर त्यावर क्लिक करा. तुमचा व्हिडिओ कॉल बँकेच्या एक्झिक्युटिव्हसोबत कनेक्ट केला जाईल. तो तुम्हाला तुमची कागदपत्रं दाखवायला सांगेल. तुम्ही त्याला ऑनलाइन कागदपत्रे दाखवून केवायसी करू शकता.
नेटबँकिंगद्वारे कसं करायचं KYC
काही बँका नेटबँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन केवायसी सुविधाही उपलब्ध करून देतात. याशिवाय नेट बँकिंगच्या माध्यमातूनही केवायसी करता येते. नेट बँकिंगसाठी तुम्हाला बँकेच्या साईटवर लॉगइन करावं लागेल. तिथे तुम्हाला KYC अपडेटचा पर्याय मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news