मुंबई: बरेच जण अजूनही बँकेत पैसे सुरक्षित आहेत असं समजून पैसे गुंतवतात. पण तुमची बँक खरंच सुरक्षित आहे का? ती बुडणार तर नाही ना अशी धाकधूक मनात असते. बऱ्याच को-ऑपरेटिव्ह बँका बंद होत आहेत. अशावेळी तुमचं खातं एका सुरक्षित बँकेत हलवणं केव्हाही चांगलं आहे. RBI ने आता स्वत: च कोणती बँक सुरक्षित आहे याची माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासू बँकांची नावे जाहीर केली. या बँका ग्राहक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की, या बँकांचे काही नुकसान झाले तर त्याचा फटका बसू शकतो. रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या बँकांची 2022 ची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये एक सरकारी आणि दोन खासगी क्षेत्रातील बँकांची नावं आहेत. 2022 च्या यादीमध्ये गेल्या वर्षी (2021) समाविष्ट असलेल्या बँकांच्या नावांचाही समावेश आहे. सरकारी बँकमध्ये अर्थातच SBI नाव आहे. तर खासगी क्षेत्रात HDFC आणि ICICI या दोन बँकांच्या नावाचा समावेश आहे. ज्या बँका बुडणे किंवा अपयश निर्माण करू शकतात अशा बँकांवर RBI ची नजर आहे.
रिझर्व्ह बँक या यादीत बँकांवर कडक नियम लावले आहेत. अशा बँकांना जोखीम-भारित मालमत्तेचा काही भाग टायर -1 इक्विटीच्या स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे. आरबीआयच्या मते, एसबीआयने आपल्या राखीव मालमत्तेपैकी 0.60 टक्के रक्कम टियर-1 इक्विटी म्हणून ठेवणे आवश्यक आहे. तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेसाठी हा हिस्सा त्यांच्या राखीव मालमत्तेच्या 0.20 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Rbi latest news