मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: आज खरेदी करा स्वस्त सोनं! सातत्याने उतर आहेत गोल्ड रेट्स; आज किती आहे भाव?

Gold Price Today: आज खरेदी करा स्वस्त सोनं! सातत्याने उतर आहेत गोल्ड रेट्स; आज किती आहे भाव?

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने घसरण होत आहे. अशावेळी तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. अशावेळी तुम्ही सोनेखरेदीचा (Buy Gold) विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47,480 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याशिवाय चांदीच्या किंमतीही आज मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

आज काय दराने होतेय सोन्याची विक्री? (10 Gram Gold Rates Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी कमी होऊन 47,480 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

चांदीचे आजचे दर (Silver Price Today)

चांदीबाबत बोलायचे झाले तर आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीच्या दरात 0.41 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर 66,720 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

हे वाचा-SBI कडून घेताय Gold Loan? अशाप्रकारे व्याजदरात मिळेल 0.75 टक्क्यांची सूट

90,000 रुपये स्तरावर पोहचू शकतात सोन्याचे दर

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सोन्यामध्ये चढउतार जारी आहे. व्हॅक्सिनेशन प्रक्रिया जगभरात सुरू झाल्यानंतर अशाप्रकार चढउतार अधिक प्रमाणात होत आहे. अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं असं म्हणणं आहे की सोन्याचे दर पुढील 3-5 वर्षात सध्यापेक्षा दुप्पट होतील. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 3000-5000 डॉलर प्रति औंसवर पोहचू शकतात. या अंदाजाने भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today