मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI Policy : रिझर्व्ह बँकेची होम लोनबाबत नवी घोषणा, घर खरेदीदारांवर काय परिणाम होणार?

RBI Policy : रिझर्व्ह बँकेची होम लोनबाबत नवी घोषणा, घर खरेदीदारांवर काय परिणाम होणार?

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी चलनविषयक धोरण जाहीर करताना सांगितले की लोअर रिस्क वेटेज आता 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आले आहे. यामुळे गृहकर्ज विभागातील मागणी मजबूत राहील आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळेल.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 एप्रिल : अर्थव्यवस्थेला गती देण्याला प्राधान्य देत रिझर्व्ह बँकेने 11व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी पतधोरण (RBI Policy) जाहीर करताना आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांच्या पूर्वीच्या पातळीवर ठेवला आहे. यासोबतच गृहकर्जाचे (Home Loan) लोअर रिस्क वेटेज एक वर्षासाठी वाढवण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयामुळे रियल्टी क्षेत्रातील पतपुरवठ्याचा फ्लो कायम राहण्यास मदत होणार आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी चलनविषयक धोरण जाहीर करताना सांगितले की लोअर रिस्क वेटेज आता 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आले आहे. यामुळे गृहकर्ज विभागातील मागणी मजबूत राहील आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळेल.

गृहकर्जाचे व्याज वाढणार नाही

घर खरेदीदारांना असा फायदा होईल की बँकांच्या गृहकर्जाचा व्याजदर वाढणार नाही. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे कर्जाची मागणी वाढली आहे, त्यामुळे बँकांकडे भांडवलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे पूर्ण करण्यासाठी, बहुतेक बँका मुदत ठेवींवर जास्त व्याज दर देत आहेत. एफडीचे दर वाढल्याने कर्जही महाग होण्याची भीती व्यक्त होत होती.

RBI MPC Meeting: कार्ड नसेल तरी नो टेन्शन! ATM मधून तरीही काढता येणार रोख रक्कम; काय आहे आरबीआयचा प्रस्ताव

बँका अधिक कर्ज देऊ शकतील

रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2020 मध्ये लोअर रिस्क वेटेज हे लोन टू वॅल्यू (Loan to value) गुणोत्तराशी जोडले होते जेणेकरून कर्जाचे जोखीम तर्कसंगत राहते. याआधी केवळ 31 मार्च 2022 पर्यंतच्या गृहकर्जासाठी मान्यता देण्यात आली होती. आता ती एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. याचा फायदा असा होईल की कमी भांडवली तरतूदीमुळे त्यांच्याकडे गृहकर्ज देण्यासाठी जास्त भांडवल असेल.

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI ने भारतातील सर्व बँकांमधील सर्व ATM मध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची (RBI Monetary Policy Committee Meeting) सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. RBI गव्हर्नर तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत  घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना याबाबत माहिती दिली. दास म्हणाले की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा UPI द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

First published:
top videos

    Tags: Home Loan, Rbi, Shaktikanta das