जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI MPC Meeting: कार्ड नसेल तरी नो टेन्शन! ATM मधून तरीही काढता येणार रोख रक्कम; काय आहे आरबीआयचा प्रस्ताव

RBI MPC Meeting: कार्ड नसेल तरी नो टेन्शन! ATM मधून तरीही काढता येणार रोख रक्कम; काय आहे आरबीआयचा प्रस्ताव

RBI MPC Meeting: कार्ड नसेल तरी नो टेन्शन! ATM मधून तरीही काढता येणार रोख रक्कम; काय आहे आरबीआयचा प्रस्ताव

RBI Monetary Policy Committee Meet: आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले याबाबतची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 एप्रिल: कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी शुक्रवारी (8 एप्रिल) महत्त्वाची घोषणा केली आहे. RBI ने भारतातील सर्व बँकांमधील सर्व ATM मध्ये कार्डलेस रोख पैसे काढण्याची (Cardless Cash Withdrawal to be Available at All Bank) सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. RBI गव्हर्नर तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत (RBI Monetary Policy Committee Meeting) घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना याबाबत माहिती दिली. दास म्हणाले की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा UPI द्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. ‘सध्या ही कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा काही बँकांच्या मर्यादित एटीएममध्येच उपलब्ध आहे. आता असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे की कार्डविरहित रोख रक्कम काढण्याची सुविधा यूपीआयचा वापर करून सर्व बँकांमध्ये आणि एटीएम नेटवर्कमध्ये उपलब्ध करून दिली जावी,’ याबाबत घोषणा करताना दास यांनी अशी माहिती दिली. हे वाचा- RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही RBI गव्हर्नर पुढे म्हणाले की, ‘व्यवहारात सुलभता वाढवण्याव्यतिरिक्त, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग इत्यादी प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल’. कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा म्हणजे काय? या सुविधेचं स्पष्टीकरण नावातच आहे. ही सुविधा वापरताना बँक कस्टमरला एटीएममधून पैसे काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. सध्या ही सुविधा विविध बँकांमध्ये उपलब्ध आहे. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक एटीएममध्ये जाण्यासाठी तयार नव्हते, त्यावेळी ही सुविधा सुरू करण्यात आल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात