Home /News /money /

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI

RBI

RBI MPC Meeting : आर्थिक सुधारणांना प्राधान्य देत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

    मुंबई, 8 एप्रिल : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) चलनविषयक धोरण समितीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. आर्थिक सुधारणांना प्राधान्य देत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, सध्या रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. यामुळे पतपुरवठ्यात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला महामारीच्या दबावातून बाहेर काढण्यास मदत होईल. रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ रेपो रेट पूर्वीप्रमाणेच 4 टक्क्यांवर कायम राहील. ही सलग 11वी बैठक आहे ज्यामध्ये RBI च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र यावेळी रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के आहे. पूर्वी तो 3.35% होता. तुम्ही वापरत असलले PAN Card बनावट तर नाही ना? तुमच्या मोबाईलद्वारे चेक करा, वाचा प्रोसेस चलनविषयक धोरण समितीने सर्वानुमते व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने शेवटची दर कपात मे 2020 मध्ये केली होती. कोरोनाव्हायरस संसर्गामुळे RBI ने फेब्रुवारी 2019 ते मे 2020 पर्यंत रेपो दरात 2.50 टक्क्यांची कपात केली होती. दर वाढवताना रिझर्व्ह बँकेला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. गेल्या काही महिन्यांपासून महागाई आरबीआयच्या कक्षेबाहेर आहे. अशा स्थितीत यावेळी रिझर्व्ह बँक दर वाढवू शकते, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत होते. चलनविषयक धोरण समितीने RBI च्या गेल्या 10 बैठकीपासून व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यासोबतच त्यांची आर्थिक धोरणाबाबतची भूमिका अनुकूल ठेवण्यात आली आहे. शेवटच्या वेळी रेपो दर 22 मे 2020 रोजी बदलला होता. तेव्हापासून रेपो दर 4 टक्क्यांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर राहिला आहे. Explainer : ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी परत मिळवता येते का? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती दर दोन महिन्यांनी धोरण आढावा बैठका घेते. 6 एप्रिल रोजी सुरू झालेली आर्थिक वर्ष 2023 ची ही पहिली आढावा बैठक आहे. महागाई RBI च्या नियंत्रणाबाहेर किरकोळ चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एका महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये 6.01 टक्के होता. महागाई दर 4 टक्के ते 6 टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्याचे RBI चे लक्ष्य आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची आर्थिक वर्ष 2023 मध्ये सहा वेळा बैठक होणार आहे. पुढील बैठक 6 जून ते 8 जून दरम्यान होणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Rbi, Rbi latest news, Repo rate, Reserve bank of india

    पुढील बातम्या