मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सर्वसामान्यांना मोठा धक्का! पुन्हा लोन महागणार, EMI वाढणार?

सर्वसामान्यांना मोठा धक्का! पुन्हा लोन महागणार, EMI वाढणार?

RBI कडून पुन्हा एकदा रेपो रेट वाढवला जाऊ शकतो. याबाबत ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

RBI कडून पुन्हा एकदा रेपो रेट वाढवला जाऊ शकतो. याबाबत ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

RBI कडून पुन्हा एकदा रेपो रेट वाढवला जाऊ शकतो. याबाबत ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : US फेडरर रिझर्व्ह बँकेनं ०.७५ टक्के व्याजदर वाढवलं त्याचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबत भारतातील शेअर मार्केटवर पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आता भारतातही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय RBI घेण्याच्या तयारीत आहे. RBI कडून पुन्हा एकदा रेपो रेट वाढवला जाऊ शकतो. याबाबत ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा चौथ्यांदा व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी १.४० टक्के रेपो रेट (व्याजदर वाढवण्यात) आला आहे. पुन्हा एकदा RBI ०.५० टक्के रेपो रेट वाढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लोन घेणं महाग होऊ शकतं. ज्यांनी लोन घेतलं आहे त्यांचे EMI वाढण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.

बायकोला द्यायचं गिफ्ट किंवा मुलीच्या लग्नासाठी खरेदी करायचे दागिने, डॉलर घेऊन आलाय गुडन्यूज

मे महिन्यात रेपो रेटमध्ये 0.40 टक्के आणि जून आणि ऑगस्टमध्ये 0.50-0.50 टक्क्यांनी वाढला होता. आरबीआयची महत्त्वपूर्ण बैठक ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याने धाकधूक वाढली आहे.

होमलोनवरील व्याजदर वाढवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. हाउसिंग डॉट कॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल यांच्या मते याचा फार फरक पडेल असं वाटत नाही.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रॉपर्टी, गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण वाढू शकतं. सणासुदीला शुभ मुहूर्तावर आपल्याकडे खरेदी केली जाते. त्यामुळे यावेळी गाडी खरेदी किंवा प्रॉपर्टीसाठी लोन घेणाऱ्यांचंही प्रमाण जास्त असतं.

Tax on Gifts: दसरा-दिवाळीच्या गिफ्टवरही लागू शकतो कर! या सोप्या मार्गानं वाचवा टॅक्स

भारतीय स्टेट बँकेनं आपल्या विशेष अहवालात ०.५० टक्के वृद्धी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. महागाईवर जोपर्यंत नियंत्रण मिळत नाही तोपर्यंत लोन किंवा EMI मधून ग्राहकांना दिलासा मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे जास्त व्याजदराने ग्राहकांना लोन भरावं लागू शकतं.>

First published:

Tags: Rbi, Rbi latest news