मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Repo Rate आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय फरक? सोप्या भाषेत समजून घ्या गणित

Repo Rate आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय फरक? सोप्या भाषेत समजून घ्या गणित

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

भारतीय रिझर्व्ह बँक दर दोन महिन्यांनी एकदा पतधोरणाचा आढावा घेते. त्यानंतर रेपो रेटबाबात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक दर दोन महिन्यांनी एकदा पतधोरणाचा आढावा घेते. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि CRR असे शब्द प्रत्येक वेळी बदलत्या धोरणाच्या वेळी आपल्यासमोर येतात. पण यामध्ये नक्की फरक काय आहे? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि CRR मध्ये नेमका फरक काय आहे?

रेपो रेट म्हणजे काय?

जेव्हा आपलं बँक खातं रिकामं होतं किंवा आपल्याला पैशांची गरज लागते तेव्हा आपण बँकेतून लोन घेतो. हे लोन फेडण्यासाठी मुदत दिली जाते. शिवाय लोन फेडताना व्याजदर देखील घेतलं जातं. रोजगार आणि कामासाठी बँकेलाही RBI कडून कर्ज घ्यावं लागतं. या कर्जावर बँकेला व्याज आकारलं जातं. बँक RBI कडून घेतलेली रक्कम आणि त्यावरील आकारलेलं व्याज दोन्ही भरते. त्याला रेपो रेट म्हणतात.

रिव्हर्स रेपो रेट काय?

देशात काम करणाऱ्या बँकांकडे दिवसभराच्या कामानंतर पैसे उरतात, तेव्हा ते पैसे बँका रिझर्व्ह बँकेत ठेवतात. RBI त्यांना या रकमेवर व्याज देते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या रकमेवर बँकांना ज्या दराने व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

डेबिट-क्रेडिटकार्डचे 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम, आजच जाणून घ्या नाहीतर....

सीआरआर म्हणजे काय?

भारतात सध्या कार्यरत असलेल्या बँकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम तयार करण्यात आले आहेत. हे नियम रिझर्व्ह बँकेने लागू केले आहेत. बँकिंग नियमांनुसार, प्रत्येक बँकेला त्यांच्या एकूण रोख रकमेचा काही भाग रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआर म्हणतात.

बँक रेट आणि रेपो रेटमध्ये काय फरक?

बँक तुम्ही लोन घेतलं. ज्या कॅटेगरीसाठी लोन घेतलं आणि जेवढे वर्ष घेतलं त्यावर व्याजदर अवलंबून असतं. प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगवेगळा असतो. या प्रणालीला बँक रेट म्हणतात. तर रिझर्व्ह बँकेकडून बँका लोन घेतात. त्यांना हे लोन व्याजासकट फेडावं लागतं त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेनं ठरवलेला रेपो रेट सगळ्या बँकांसाठी सारखा असतो.

RBI ने ५ ऑगस्ट रोजी रेपो रेटमध्ये वाढ केली. सध्या ५.४० टक्के रेपो रेट आहे. ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर-सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Money, Rbi, Rbi latest news