मुंबई : रुपयाचं मूल्य घसरलं आहे. दोन वर्षांत सर्वात जास्त सोन्याचे दर घसरले आहेत. तर डॉलर्सची किंमत वाढली आहे. डॉलरने नवा रेकॉर्ड केला आहे. ८१. ५४ रुपये डॉलरचं मूल्य झालं आहे. Gold MCX मध्ये ०.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर Gold INTL मध्ये ०.३४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दोन वर्षांत सोन्याचे एवढे दर का घसरले? सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलर इंटेक्समध्ये मजबूती दिसत आहे. येत्या काही दिवसांत अजून सोन्याचे दर घसरतील असंही ते म्हणाले. COMEX मध्ये सोनं १.५ टक्क्यांनी घसरून १६५० डॉलरवर पोहोचलं आहे. MCX वर सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारांच्या खाली आले आहेत. MCX वर सोन्याचे दर गेल्या ६ महिन्यांपासून खाली येत असल्याचं दिसत आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे दबाव असल्याचं मत मेहता यांनी व्यक्त केलं आहे. लाँग टर्मसाठी जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक कऱण्याचा विचार ऑनलाईन करत असाल तर तो चांगला असल्याचंही मेहता यांनी म्हटलं आहे. आता घेऊन लगेच तुम्ही सोनं काढणार असाल तर त्यामध्ये जोखीम आहे त्यामुळे तुम्ही आवश्यक ती काळजी घ्यायला हवी असंही ते म्हणाले.
#LIVE | सोना खरीदने का सुनहरा मौका ! और कितना रुलाएगा रुपया कच्चे तेल में क्या बनाएं रणनीति | मिलेगा किचन को चैन! ? देखिए #CommodityRoundup @Manisha3005 और @deepaliranaa के साथ | @Rupakde1 @Sharekhan @PankajRandad @RaajeeoRanjan https://t.co/9T3CXUIbTt
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) September 26, 2022
सध्या ग्राहक सोनं खरेदीसाठी जाईल की नाही याबाबत शंका आहे. कारण जेव्हा जेव्हा सोन्याचे दर घसरले आहेत तेव्हा मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जाते असं फार कमी दिसून येतं.
नवरात्र सुरू आहे. सोनं ४८ हजारापर्यंत येईल अशी ग्राहकांना आशा आहे. त्यामुळे अजून तरी मोठ्या प्रमाणात ग्राहक सोनं खरेदीकडे वळताना दिसत नाही. मात्र सोन्याचे दर अजून खाली येईल अशी आशा ग्राहकांना आहे.