मुंबई, 21 ऑक्टोबर: कोरोनाच्या संकटातून अजूनही भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy during Coronavirus Pandemic) पूर्णपणे सुधारली नाही आहे. देशाची आर्थिक घडी हळूहळू सावरत आहे. दरम्यान ज्यांनी या काळात नोकरी (Job Loss during Coronavirus) गमावली आहे किंवा पगारवाढ न झाल्याने जे हिरमुसले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतात लवकरच उच्च पगाराच्या नोकऱ्या (High Paid Salary Job) पुन्हा एकदा देऊ केल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा ते सुगीचे दिवस परतणार आहेत. कोरोनाआधीच्या High Salary Jobs च्या काळात भारत पुन्हा एकदा परतणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या अहवालात अशी माहिती मिळते आहे की, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना कायम ठेवण्यासाठी कंपन्या पुढील वर्षी सरासरी 9.3 टक्के पगारवाढ करू शकतात. या वर्षी सरासरी 8 टक्के पगारवाढ झाली आहे.
ज्यांनी नोकरी गमावली आहे त्यांच्यासाठी आशेचा किरण म्हणजे पुढील वर्षापासून लोकांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळू लागतील अशी अपेक्षा आहे. जागतिक सल्लागार, ब्रोकिंग आणि सोल्युशन्स कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या 'सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्ट' मध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे आणि त्यांना कामावर कायम ठेवणे हे कंपन्यांसमोरचे आव्हान आहे. अशा स्थितीत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पगारवाढ देतील. पुढील वर्षात देशातील सरासरी पगार वाढ आशिया पॅसिफिकमध्ये सर्वाधिक असल्याचा अंदाज आहे. पुढील 12 महिन्यांत व्यवसायाचे वातावरण देखील झपाट्याने सुधारेल अशी अपेक्षा आहे.
वाचा-Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण; का सुरु आहे प्रॉफिट बुकिंग?
विलिस टॉवर्स वॉटसनच्या सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्टसाठी मे ते जून दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये आशिया पॅसिफिकमधील 13 देशांतील विविध क्षेत्रातील सुमारे 1,405 कंपन्यांचा समावेश होता. यामध्ये भारतीय कंपन्यांची संख्या 435 आहे.
अहवालात अशी माहिती समोर आली आहे की भारतात सर्वेक्षण केलेल्या 52 टक्के कंपन्यांचा महसूल पुढील 12 महिन्यांत वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत हा आकडा सुमारे 37 टक्के होता. हा अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्तीची (Economic Recovery in India) गती वाढण्याचे संकेत देत आहे. नोकरी देण्याबाबतही कंपन्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. सर्वेक्षण केलेल्या सुमारे 30 टक्के कंपन्यांनी पुढील 12 महिन्यांत नोकरभरती करण्यास सहमती दर्शविली.
वाचा-मोठी बातमी! Facebook वर 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड, वाचा काय आहे कारण
कोणत्या क्षेत्रात होणार सर्वाधिक नोकरभरती?
अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, विक्री आणि वित्त यासारख्या क्षेत्रात भरती होण्याची अधिक शक्यता आहे. इंजीनिअरिंग सेक्टरमध्ये 57.5 टक्के, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 53.3 टक्के, तांत्रिक कौशल्यात 34.2 टक्के, सेल्स सेक्टरमध्ये 37 टक्के आणि वित्त क्षेत्रात 11.6 टक्के कंपन्यांत जास्तीत जास्त नवीन भरती दिसतील. या सर्व क्षेत्रात कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना जास्त पगार देतील. त्याचबरोबर जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. अहवालात असेही समोर सांगण्यात आले आहे की, भारतात नोकरी कमी होण्याचे प्रमाण आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उर्वरित देशांच्या तुलनेत कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Job, Job alert