नवी दिल्ली, 08 जुलै: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), बंधन बँक (Bandhan Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तसंच बँक ऑफ महाराष्ट्रसह (Bank of Maharashtra) 14 बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने (Reserve Bank of India) जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये याबाबत माहिती दिली आहे. या 14 बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, को-ऑपरेटिव्ह बँका आणि एका स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश आहे. या बँकांवर 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘बँकांनी ज्या नियमांचं उल्लंघन केलं आहे त्यामध्ये एनबीएफसींना (NBFC) कर्ज देणं आणि एनबीएफसींना बँक फायनान्स करण्यासंबंधीत नियमात दुर्लक्ष केल्याचा समावेश आहे.’ हे वाचा- परभणीमध्ये इंधनाचा भडका! 109 रुपये प्रति लीटरवर पोहोचले पेट्रोलचे दर पहिल्यांदाच एवढ्या सर्व बँकांवर ठोठावला दंड असं पहिल्यांदाच घडत आहे की एकत्र एवढ्या बँकांवर आरबीआयने दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलं आहे की, ‘लार्ज कॉमन एक्सपोजर्सची सेंट्रल रिपॉझिटरी, सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इनफॉरमेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) चं रिपोर्टिंग, स्मॉल फायनान्स बँकांसाठी असणाऱ्या ऑपरेटिंग गाइडलाइन्स या संबंधित नियमांकडे बँकांनी दुर्लक्ष केलं आहे.’ याशिवाय बँकांनी बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 च्या सेक्शन 19(2) आणि सेक्शन 20(1) चं उल्लंघन केलं आहे. हे वाचा- खूशखबर! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, 8750 रुपयांनी स्वस्त आहे सोनं कोणत्या बँकांवर आरबीआयने ठोठावला दंड? स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, बंधन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईस, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साउथ इंडियन बँक, जेअँडके बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.