नवी दिल्ली, 08 जुलै: सोन्याच्या किंमतीमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याचे आणि चांदीचे दर (Gold and Silver Price Today) उतरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर (Gold Rates Today) 0.3 टक्क्यांनी कमी होत 47,776 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर (Silver Rates Today) 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 69, 008 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.1% ने वाढून 1,804.30 डॉलर प्रति औंस झाली आहे. रेकॉर्ड लेव्हलवरून 8750 रुपयांनी स्वस्त झालं सोनं 2020 साली सोन्याचे दर या कालावधीदरम्यान सर्वोच्च स्तरावर होते. त्यावेळी सोन्याचे दर 56191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आज ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 47700 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. अर्थात सोन्याचे दर 8750 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहेत. हे वाचा- परभणीमध्ये इंधनाचा भडका! 109 रुपये प्रति लीटरवर पोहोचले पेट्रोलचे दर तुमच्या शहरातील सोन्याचांदीचे भाव Good Returns वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,970 रुपये आणि 4,79,700 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46,970 रुपये प्रति तोळा आहेत. देशातील मुख्य शहरातील सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 50,850 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,970 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47,930 रुपये प्रति तोळा आहेत. हे वाचा- आज मुंबईमध्ये स्वत:चं घर खरेदी करण्याची संधी,या ठिकाणीही आहे स्वस्तात प्रॉपर्टी कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 47,200 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,900 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 45,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,250 रुपये प्रति तोळा आहेत. या वेबसाइटनुसार चांदीचे दर प्रति किलो 70,000 रु आहेत. दिल्लीमध्ये चांदीचे दर 68,800 रुपये प्रति किलो आहेत. मुंबई आणि कोलकातामध्ये देखील हाच भाव आहे. चेन्नईमध्ये चांदीचे दर 74,900 रुपये प्रति किलो आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.