मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI ने ठोठावला या महत्त्वाच्या बँकेवर 2 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

RBI ने ठोठावला या महत्त्वाच्या बँकेवर 2 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi penalty on banks) खासगी क्षेत्रातील कर्जदाता बँक असणाऱ्या आरबीएल बँकेवर (rbi penalty on RBL Bank) दंडात्मक कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi penalty on banks) खासगी क्षेत्रातील कर्जदाता बँक असणाऱ्या आरबीएल बँकेवर (rbi penalty on RBL Bank) दंडात्मक कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi penalty on banks) खासगी क्षेत्रातील कर्जदाता बँक असणाऱ्या आरबीएल बँकेवर (rbi penalty on RBL Bank) दंडात्मक कारवाई केली आहे.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi penalty on banks) खासगी क्षेत्रातील कर्जदाता बँक असणाऱ्या आरबीएल बँकेवर (rbi penalty on RBL Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. काही महत्त्वाच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर (Reserve Bank of India penalty on Bank) ही कारवाई करण्यात आली आहे. नियामक अनुपालनात त्रुटी आणि बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा 2 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आरबीएल बँकेच्या तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने काही नियामक सूचना आणि बँकिंग नियमन कायद्याचे पालन न केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामध्ये सहकारी बँकेच्या नावे पाच बचत खाती उघडणे आणि बँकेच्या संचालक मंडळाची रचना यांचा समाविष्ट आहे.

आरबीआयने आरबीएल बँकेला नोटीस बजावली आहे की त्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आणि बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींची पूर्तता न केल्याबद्दल बँकेवर दंड का आकारला जाऊ नये? या कारणे दाखवा नोटीसला आरबीएल बँकेचे उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर, रिझर्व्ह बँक या निष्कर्षापर्यंत पोहोचली की या उल्लंघनांसाठी दंड आकारण्यात यावा.

LPG Cylinder Subsidy: पुन्हा मिळू शकेल LPG वर सब्सिडी, सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबईतील या बँकेवर देखील दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील बँकेवर दंड आकारला आहे. एनपीए वर्गीकरणासह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने अपना सहकारी (RBI Penalty on Apana sahakari Bank) बँकेवर 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँकेच्या वैधानिक तपासणीत काही निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले होते. बँकेने एनपीए वर्गीकरण, मृत वैयक्तिक ठेवीदारांच्या चालू खात्यातील ठेवींवर व्याज भरताना किंवा दावे निकाली काढताना शिवाय बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न राखल्याने दंडात्मक शुल्क आकारण्याच्या निर्देशांचे पालन केले नव्हते

3 दिवसांनी करावं लागणार 12 तास काम,नवीन लेबर कोडबाबत काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

बँक ग्राहकांवर काय होणार परिणाम?

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, दंड नियामक अनुपालनाअभावी लावण्यात आला आहे आणि बँकेने त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार नाही.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news