• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 3 दिवसांनी नोकरीच्या ठिकाणी करावं लागणार का 12 तास काम, नवीन लेबर कोडबाबत काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

3 दिवसांनी नोकरीच्या ठिकाणी करावं लागणार का 12 तास काम, नवीन लेबर कोडबाबत काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

News Labour Codes: नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी (Take home Salary) कमी होईल. तर कंपन्यांवर जास्त पीएफ देण्याचं ओझं वाढणार आहे. तर नवीन मसुद्याच्या नियमानुसार मूलभूत वेतन (Basic Salary) एकूण पगाराच्या 50% किंवा त्याहून असावे लागणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 28 सप्टेंबर: देशातील अधिकतर खासगी आणि सरकारी कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर असा मोठा प्रश्न आहे की त्यांना 3 दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबर 2021 पासून 12 तास काम करावे लागेल का. केंद्रातील मोदी सरकार पुढील महिन्यापासून नवीन लेबर कोड नियम (New Labour Codes) लागू करेल का? जर हे नियम लागू झाले तर तुमचं ऑफिस टायमिंग वाढू शकतं. नवीन कामगार कायद्यांमध्ये 12 तासांचं ऑफिस टायमिंग करण्याची तरतुद आहे. याशिवाय तुमची इन हँड सॅलरी देखील बदलू शकते. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी (change in Take home Salary) कमी होईल. तर तुम्हाला मिळणारी पीएफची रक्कम वाढू शकते. या सर्व प्रश्नांच्या दरम्यान, अशी माहिती मिळते आहे की कामगार मंत्रालय 1 ऑक्टोबर 2021 पासून हे नवीन नियम लागू करू शकणार नाही. याचे पहिले कारण राज्यांच्या तयारीचा अभाव आणि दुसरे कारण उत्तर प्रदेशसह देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका हे सांगितले जात आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं टेक होम सॅलरी कमी होणार तर पीएफ वाढणार नवीन मसुद्याच्या नियमानुसार मूलभूत वेतन (Basic Salary) एकूण पगाराच्या 50% किंवा त्याहून अधिक असावे. यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या पगाराची रचना बदलली जाईल. यामुळे तुमचा हाती येणारा पगार कमी होऊ शकतो आणि पीएफची रक्कम वाढू शकते. ग्रॅच्युइटी आणि पीएफ योगदान वाढल्यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ होईल. पीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढल्यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होईल. कारण त्यांना कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिक योगदान करावं लागेल. या सर्व गोष्टींमुळे कंपनीच्या बॅलन्स शीटवर देखील परिणाम होईल. Petrol Price Today: सामान्यांच्या खिशाला चाप! पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेलही कामाचे तास 12 तास नवीन लेबर कोडनुसार, कामाचे तास वाढून 12 तास करण्याची तरतूद आहे. अधिकतर कार्यालयांमध्ये 8 ते 9 तासाची शिफ्ट असते. नवीन नियमानंततर आठवड्यात 48 तास काम करावे लागेल. जर एखाद्या व्यक्तीने 8 तास काम केले तर त्याला 6 दिवस काम करावं लागेल. 9 तास काम केले तर आठवड्यातील 5 दिवस काम करावं लागेल. तुम्ही 12 तास कामं केलं तर 4 दिवस काम म्हणजे आठवड्यातील 3 दिवस सुट्टी मिळेल. मात्र कामगार संघटनांकडून 12 तासांच्या शिफ्टचा विरोध केला जात आहे. भारीच! फक्त कोबी, ब्रोकोली काढण्यासाठी 63 लाख पगार; कंपनीने ऑफर केला ड्रिम जॉब लेबर कोड लागू झाल्यास, ड्राफ्ट नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 5 तास काम करता येणार नाही, कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल. शिवाय 15 ते 30 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला 30 मिनिटं असं मोजून त्याचा समावेश ओव्हरटाइममध्ये करण्याची तरतूद आहे. सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी कामाला ओव्हरटाइम मानलं जात नाही.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: