मुंबई, 30 मे : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडल्यामुळे त्या बँकांमध्ये जमा केल्या जात आहेत. या नोटा जमा करण्यासाठी बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. त्याचवेळी आरबीआयने याबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे, परंतु जर तुम्ही नाणे बँकेत जमा करण्यासाठी गेलात तर याबाबत काही नियमही करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया तुम्ही एकत्र किती नाणी जमा करू शकता?
भारतीय बाजारात सध्या एक, दोन, पाच, दहा आणि 20 ची नाणी चलनात आहेत. मात्र, डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू झाल्यापासून या नाण्यांचा वापर कमी झालाय. बहुतेक लोक यूपीआयद्वारे 10 आणि 20 रुपयांपर्यंत पैसे देत आहेत. अशा स्थितीत बाजारात कमी नाणी पाहायला मिळत आहेत.
Airplane Facts: विमानाची खिडकी चौकोनी का नसते, गोलच का असते? इंट्रेस्टिंग आहे कारणकोणत्या मूल्याची नाणी जारी केली जाऊ शकतात?
ही सर्व नाणी आरबीआयने जारी केली आहेत. नाणी कायदा 2011 अंतर्गत 1000 रुपयांपर्यंतची नाणी जारी केली जाऊ शकतात. एका वर्षात आरबीआयकडे किती नाणी टाकली जातात, हे सरकार ठरवते. किंमत ठरवून आराखडा तयार करण्याची जबाबदारीही सरकारची आहे. सध्या चलनात असलेल्या नाण्यांचे डिझाईनही सरकारने ठरवले आहे.
क्रेडिट स्कोअर कमी असुनही मिळेल लोन! फक्त ट्राय करा या ट्रिक्सबँकेत किती नाणी जमा करता येतात?
यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याचा अर्थ तुम्ही कितीही नाणी बँकेत जमा करू शकता. बँक ग्राहकांकडून कितीही रकमेची कितीही नाणी स्वीकारू शकते. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही रकमेची नाणी तुमच्या खात्यात जमा करू शकता. फक्त हे नाणे वैध असावेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नाणी कोणत्याही बँकेत जमा करता येतात. यासाठी कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही. असे झाल्यास, तुम्ही RBI पोर्टलवर तक्रार करू शकता.