मुंबई, 30 मे : तुमच्यापैकी अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल. पण असे बरेच लोक असतील ज्यांनी कधी ना कधी टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये विमान आतून आणि बाहेरून पाहिले असेल. अशा वेळी विमानाची खिडकी चौकोनी किंवा टोकदार ऐवजी गोल का असते असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे खास कारण सांगतो. विमानांची दुनिया या सिरीजमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत.
…म्हणून गोल असतात विमानाच्या खिडक्या
खरं पाहिल्यास विमानाची खिडकी पूर्णपणे गोल नाही. पण त्यात कोपरे नसतात आणि ते जवळजवळ गोलाकार आकारात बनवलेले असतात. आता विमानाच्या खिडकीला कोपरे का नसतात. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खिडकीचा आकार चौकोनी असेल तर ती हवेचा दाब सहन करू शकणार नाही आणि ती आकाशात जाताच किंवा त्यापूर्वीच तडे जाते. तर गोल आकारात बनवलेली खिडकी वाऱ्याचा दाब सहज सहन करते. कारण खिडकीच्या गोल किंवा वक्र आकारामुळे हवेचा दाब सर्व बाजूंनी समान प्रमाणात वितरीत होतो.
यासोबतच ज्यावेळी विमान आकाशात असते तेव्हा हवेचा दाब विमानाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे असतो आणि तो वेळोवेळी बदलत असतो. म्हणूनच विमानात गोल खिडक्या बसवल्या जातात.
शेकडो लोकांना घेऊन आकाशात उडणारं विमान किती रुपयांचं? कधी विचार केलाय?विमानाची खिडकी पूर्वी चौकोनी असायची
पूर्वीच्या विमानात, गोल ऐवजी फक्त चौकोनी खिडक्या बनवल्या गेल्या होत्या. पण याचे कारण म्हणजे पूर्वीची विमाने कमी वेगाने कमी उंचीवर उडत असत. त्यामुळे चौकोनी खिडक्यांवरचे काच वाऱ्याचा दाब सहन करत असत. पण जसजशी विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली तसतशी विमानाचा वेगही वाढू लागला आणि त्याचवेळी विमान अधिक उंचीवर उडू लागले आणि तेवढ्यातच वेग जास्त असल्याने विमानाचा अपघात होऊ लागला. यानंतर गोलाकार खिडक्या तयार केल्या जाऊ लागल्या. यानंतरपासून अशाच खिडक्या आजपर्यंत बनवल्या जातात.