जाहिरात
मराठी बातम्या / मनी / क्रेडिट स्कोअर कमी असुनही मिळेल लोन! फक्त ट्राय करा या ट्रिक्स

क्रेडिट स्कोअर कमी असुनही मिळेल लोन! फक्त ट्राय करा या ट्रिक्स

क्रेडिट स्कोअर

क्रेडिट स्कोअर

तुम्हाला पैशाची गरज असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स अवलंबून तुम्ही तुमचा मार्ग सुकर करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : आणीबाणीच्या वेळीच आपण इतरांकडून कर्ज घेतो. कर्जाची रक्कम मोठी असेल तर आपण बँका किंवा NBFC ची मदत घेतो. ज्या लोकांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्यांना बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण ज्यांचा क्रेडिट स्कोअर एका लिमिटपेक्षा कमी आहे त्यांना बँक कर्ज देण्यास नकार देतात. CIBIL स्कोअरबद्दल बोलायचे झाल्यास, 750 किंवा त्याहून अधिक स्कोअर चांगला मानला जातो. CIBIL स्कोअर 700 पेक्षा कमी असलेल्यांना पर्सनल लोन मिळणे कठीण होऊ शकतं. ज्या लोकांचा CIBIL स्कोर 700 पेक्षा कमी आहे आणि त्यांना बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे ते काही टिप्स अवलंबू शकतात. यामुळे पर्सनल लोन घेण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअरमध्ये काही दोष आहे का?

लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही प्रथम तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासला पाहिजे. अनेक वेळा क्रेडिट रिपोर्ट अपडेट होत नाही किंवा त्यात काही चुकीची एंट्रीही असू शकते. जर तुम्हाला असा काही दोष दिसला तर कर्ज घेण्यापूर्वी ते दुरुस्त करा.

तुम्ही कर्जाची परतफेड करु शकता असा विश्वास द्या

तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही त्रुटी असतील ज्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकत नाही. तर तुम्ही कर्जदाराला खात्री देऊ शकता की तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता आहे. क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमचा पगार, तुमची बचत किंवा तुमच्या एकूण संपत्तीचा तपशील नसतो. अशा परिस्थितीत कर्जदाता तुम्हाला जास्त इंट्रेस्ट रेटने लोन देण्यास राजी होऊ शकतो.

IRCTC: फक्त 16,000 रुपयांत करा दक्षिण भारताची सैर! पाहा कोणत्या सुविधा मिळतील

जॉइंट लोनसाठी करा अप्लाय

तुमचा CIBIL स्कोर कमी असल्यास, तुम्ही तुमचे वडील, भाऊ, बहीण किंवा जोडीदार यांच्यासोबत जॉइंट लोनसाठी अर्ज करू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत कर्जासाठी जॉइंट अर्ज करणार आहात त्यांचा CIBIL स्कोर जास्त असावा. अशा प्रकरणांमध्ये, कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतर कर्जदाता कर्ज मंजूर करू शकतो.

कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करा

वरील टिप्स काम करत नसतील तर दुसरा मार्ग म्हणजे कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करणे. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, कर्जदात्याला मोठ्या कर्जाच्या रकमेची EMI परत करण्याच्या तुमच्या क्षमतेवर शंका येऊ शकते. जर कर्जाची रक्कम कमी असेल तर तुम्ही बँकेला ते परत करण्यास पटवून देऊ शकता.

IRCTC: फक्त 8 हजारात करा ऊटीची सैर, पाच दिवसांचं खास टूर पॅकेज

NBFC किंवा Fintech कंपन्यांकडून कर्ज

तुम्ही हा उपाय अगदी शेवटी वापरावा. कमी क्रेडिट स्कोअर / कमी CIBIL स्कोअर असूनही अनेक NBFC आणि नवीन काळातील फिनटेक कंपन्या तुमचे कर्ज मंजूर करू शकतात. मात्र, त्यांचे व्याजदर बँकांपेक्षा जास्त असू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात