नवी दिल्ली, 29 जानेवारी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी इकोनॉमिक ग्रोथ, इंफ्लेशन आणि करेंसी याविषयी भाष्य केले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत. चलनवाढ, आर्थिक वाढ आणि चलनातील अस्थिरता यावरील ताज्या आकडेवारीवरून असे सूचित होते की, आर्थिक बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ हा मागे पडला आहे.
ते म्हणाले की, 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. परंतु असे दिसते की, वाढ आणि चलनवाढ या दोन्ही बाबतीत सर्वात वाईट स्थिती मागे पडली आहे. विशेष म्हणजे डिसेंबरमध्येही शक्तीकांत दास यांनी उच्च व्याजदर सुरू ठेवण्याबाबत भाष्य केलं होतं. यावेळीही त्यांनी उच्च व्याज दर दीर्घ कालावधीसाठी टिकून राहू शकतात असं म्हटलंय.
फेब्रुवारी महिन्यात 'एवढे' दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची लिस्ट
ते म्हणाले की, कोविड महामारीमुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने आणि विविध देशांमध्ये चलनवाढ काही प्रमाणात कमी केल्याने, मध्यवर्ती बँकांनी कमी दर वाढ किंवा स्थिरता दर्शविण्यास सुरुवात केली आहे. महागाई दर अजूनही उच्च आहे. दास म्हणाले की, मध्यवर्ती बँक महागाई आपल्या लक्ष्य श्रेणीत आणण्यासाठी कटिबद्ध आहे. उच्च दर दीर्घकाळ टिकू शकतात. वृद्धीविषयी बोलताना, ते म्हणाले की काही महिन्यांपूर्वीपर्यंत व्यापक आणि तीव्र मंदीची शक्यता होती, परंतु आता असे दिसते की सामान्य मंदी असेल.
WhatsApp च्या माध्यमातून चेक करा बँक बॅलेन्स, पण कसं?
शक्तीकांत दास पुढे बोलताना म्हणाले की, अशा अनिश्चित आंतरराष्ट्रीय वातावरणात 'आपली अर्थव्यवस्था मजबूत उभी आहे' दास म्हणाले, 'आपली आर्थिक व्यवस्था मजबूत आणि स्थिर आहे. बँका आणि कंपन्यांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे.
दास म्हणाले, 'आपली आर्थिक व्यवस्था मजबूत आणि स्थिर आहे. बँका आणि कंपन्यांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. बँकेचे कर्ज दुहेरी अंकात वाढत आहे. उदास जगात आपल्याकडे सहसा आशेचा किरण म्हणून पाहिले जाते. आपली चलनवाढ कायम आहे, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लक्षणीय घट झाली आहे. देशांतर्गत वित्तीय बाजारांबद्दल दास म्हणाले, 'आपण 1990 च्या दशकापासून आर्थिक बाजारपेठ विकसित करण्यामध्ये खूप पुढे आलो आहोत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rbi, Shaktikanta das