मुंबई, 28 जानेवारी: आजकाल जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतो. हे प्रामुख्याने चॅटिंगसाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की चॅटिंग व्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. WhatsApp आपल्या यूझर्सला अनेक प्रकारच्या सेवा देते. त्यापैकी एक म्हणजे WhatsApp पेमेंट्स. याद्वारे तुम्ही एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता. यासोबतच तुम्ही तुमचे बँक बॅलेन्स देखील तपासू शकता. तसे कसे तपासावे याविषयी आपण जाणून घेऊया...
व्हॉट्सअपचा वापर चॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हेच अॅप आता यूझर्सला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध करुन देतेय. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही अकाउंटवरुन दुसऱ्या कोणाच्याही अकाउंटमध्ये यूपीआयच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करु शकता. एवढेच नाही तर तुमचे बॅलेन्स देखील तुम्ही चेक करु शकता. व्हॉट्सअॅप पेमेंट्स अॅक्टिव्ह कसे करावे याची प्रोसेस जाणून घेऊया...
Twitter यूझर्सला मिळाला मोठा अधिकार, 1 फेब्रुवारीपासून...
-व्हॉट्सअॅप पेमेंट्स चालू करण्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करा.
-स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात थ्री डॉट्सवर टच करा.
-यानंतर पेमेंटचे ऑप्शन सिलेक्ट करा.
-येथे ‘Add Payment Method' वर क्लिक करा.
-यानंतर बँक तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करेल.
-तुमच्या समोर बँकांची यादी येईल. यामधून तुमचे बँक अकाउंट निवडा.
-'Done' वर क्लिक करा.
-तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असेल.
आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस
-व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपले बँक बॅलेन्स तपासण्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करावे.
-सेटिंग्समध्ये जाऊन अधिकच्या ऑप्शनवर टॅप करा.
-येथे पे आणि बँक अकाउंटवर क्लिक करा.
-यानंतर बॅलेन्स पाहा हे ऑप्शन निवडा.
-तुमचा यूपीआय पिन टाका.
-याच्या मदतीने तुमच्या स्क्रीनवर तुमचे बँक बॅलेन्स तपासता येईल.
व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा देते. प्रायमरी बँक सेटअप दरम्यान, यूझर्सला केवळ पेमेंट अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारण्यास सांगितले जाते. व्हॉट्सअॅपच्या लिस्टमध्ये कोणत्याही बँकेचे नाव दिसत नसेल, तर तुमची बँक अद्याप त्याच्याशी जोडलेली नसण्याची शक्यता आहे. याशिवाय सुरक्षेसाठी तुम्ही नेहमी व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन वापरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, WhatsApp features