मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर खरेदीचा विचार करत असाल तर हे वाचा; सर्वात स्वस्त झालंय Home loan

घर खरेदीचा विचार करत असाल तर हे वाचा; सर्वात स्वस्त झालंय Home loan

RBI च्या एका निर्णयामुळे 4 जूनपासून गृहकर्जही स्वस्त झालं आहे. घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ज्ञ काय सांगत आहेत वाचा...

RBI च्या एका निर्णयामुळे 4 जूनपासून गृहकर्जही स्वस्त झालं आहे. घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ज्ञ काय सांगत आहेत वाचा...

RBI च्या एका निर्णयामुळे 4 जूनपासून गृहकर्जही स्वस्त झालं आहे. घर खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ज्ञ काय सांगत आहेत वाचा...

  • Published by:  Prem Indorkar

नवी दिल्ली, 5 जून : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (MPC) गृहकर्जावरील (Home Loan) कमी व्याज दराचे (Interest Rate) 4 जूनपासून असलेले धोरण जैसे थे ठेवत बेंचमार्क दरही कायम ठेवले आहे. रिअल इस्टेट (Real Estate) उद्योगाने गृहकर्जाचे व्याजदर कमी ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरबीआयने यथास्थिती कायम ठेवत या क्षेत्राला मदत केली असल्याचे अॅसोचेमचे (ASSOCHAM) अध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दोन महिन्यांत रिअल इस्टेट उद्योगाला मोठा फटका बसला असून या उद्योगावर तीव्र परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि मागणीला चालना देण्यासाठी केंद्रीय बॅंकेने रेपो रेट (Repo Rate) 4 आणि रिव्हर्स रेपो रेट (Reverse Rapo Rate) 3.35 टक्के असा कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने कोरोना महामारीचे झालेले दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक आहे तोपर्यंत अनुकूल भुमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले.

सहाव्या वेळी रिझर्व्ह बॅंकेने बेंचमार्क दर (Benchmark Rate) कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा थेट सामना करण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरत आहेत तसेच याचा फायदा गृह कर्जदारांना होतो, असे नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. मागील 2 दशकांपासून फ्लोटिंग रिटेल कर्जाचे दर कमी पातळीवर कायम आहेत आणि हे आणखी काही काळ सुरु राहण्याची शक्यता आहे. फ्लोटिंग रिटेल लोन चे दर थेट बाह्य बेंचमार्क रेपो रेटशी जोडलेले  असल्याचे हिरानंदानी यांनी स्पष्ट केले.

गृह खरेदी साठी सकारात्मक असलेल्यांकरिता धोरण ठरवताना अॅनारॉक प्रॉपर्टीचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की कमी व्याज दराचे नियमन सर्व कर्जदारांसाठी चांगले काम करते कारण उच्च परवडणारे हे वातावरण अजून काही काळ सुरु राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:RBI ची मोठी घोषणा: Bank Holiday असेल तरी तुमचा पगार, पेन्शन नाही खोळंबणार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढाकार घेत असून ही बाब चांगली आहे. दशकात गृह कर्जावर कमी व्याजदर टिकून राहिल्यास हा काळ घर खरेदीसाठी सर्वोत्तम काळ ठरतो. त्यामुळे ही बाब दुहेरी काम करते, असे नो ब्रोकर डॉट कॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी सौरभ गर्ग यांनी सांगितले.

प्रथम स्थिर आणि कमी गृहकर्ज दरामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदीला चालना मिळेल. बऱ्याच संभाव्य घर खरेदीदारांना भौतिक मालमत्तेचे मालक होण्याचे महत्व कळले आहे. आणि दुसरे म्हणजे या क्षेत्रासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने निरोगी आणि अर्थिक विकासाला चालना मिळेल, असे गर्ग यांनी स्पष्ट केले.

मुद्रांक शुल्कात कपात केल्याने या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी झाली असल्याचे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. हे पुन्हा केले जाऊ शकते आणि ही उपाययोजना अधिकाधिक राज्यांनी स्विकारली तर अधिक मागणी वाढण्यास मदत होईल, असेही गर्ग यांनी पुढे नमूद केले.

हे ही वाचा:या कंपनीच्या शेअर्सनी दिले आठवड्याभरात 100 टक्के रिटर्न्स; फक्त 50 रुपये किंमत

गेल्या काही महिन्यांतील कमी व्याजदरामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत मागणी वाढली असल्याचे दिसून आले आहे आणि घर खरेदीसाठी इच्छूक असलेल्या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. कोरोनाचा लहरीपणा आणि विविध प्रदेशांमध्ये लॉकडाऊनमुळे (Lockdown) विस्कटलेली अर्थिक घडी आता रुळावर येताना दिसत आहे. या निर्णयामुळे काही काळ तरलता टिकून राहण्यास मदत होईल, असे ट्रान्सकॉन डेव्हलपर्सच्या संचालिका श्रध्दा केडीया-अग्रवाल यांनी सांगितले.

भारत, आग्नेय आशिया, मध्य,पूर्व आणि आफ्रिका, सीआरबीईचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगेआरबीआयचा निर्णय झिन यांनी सांगितले की आरबीआयच्या अनुकूल भुमिकेमुळे गृह खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांच्या भावना टिकून राहतील. यामुळे दुसऱ्या लाटे पूर्वस्थितीला बळकटी येईल. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवल्याने बॅंका आणि एनबीएफसी घर खरेदीदाराला कमी दराने कर्ज देतील, आणि यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणीला पाठिंबा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीस चालना देण्यासाठी बँकिंग नियामकांनी एनएचबीला आर्थिक पाठबळ जाहिर करावे, असे हाऊसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रोपटीगिअर या ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले.

First published:

Tags: Home Loan, Interest limit, Rbi