मुंबई, 3 जून: मुंबईतील रिअॅलिटी कंपनी प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties) कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका आठवड्यापासून मोठी वाढ होत आहे. फक्त एका आठवड्यात कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले आहे. Prozone Intu Properties च्या शेअर्समधील वाढ बघता एक्सपर्ट्स या कंपनीत गुंतवणूक (investment) करण्याचा सल्ला देत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्या देशातील दोन महत्वाच्या गुंतवणुकदारांनी देखील पैशांची गुंतवणूक केली आहे. गुरुवारी बीएसईवर (BSE) या कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या सर्वाधिक 40.25 रुपयांवर पोहोचले.
दिग्गजांचीही गुंतवणूक
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties) या कंपनीच्या शेअर्समध्ये राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि डी-मार्टचे फाउंडर राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांनी गुंतवणूक केली आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे. या कंपनीत झुनझुनवाला यांची भागीदारी 2.06 टक्के आहे. म्हणजेच त्यांचे 31,50,000 शेअर्स आहेत. तर दमानी यांचे 1.26 टक्के म्हणजेच 19,25,000 शेअर्स आहेत.
Prozone Intu Propertiesच्या शेअर्सने फक्त 7 ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 100 टक्के रिटर्न दिले आहेत. 26 मे रोजी शेअर्सचा दर 20.4 रुपये होता, तो आता जवळपास 100 टक्क्यांनी वाढून 40.25 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारीदेखील स्टॉकमध्ये 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आहे.
LICची खास पॉलिसी 28 रुपयांत मिळणार 2 लाखांपर्यंत विमा; जाणून घ्या सविस्तर
स्टॉकच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कंपनीची मार्केट कॅप दुप्पट झाली आहे. 26 मे रोजी शेअरच्या दरावर कंपनीची मार्केट कॅप 302.92 कोटी रुपये होती. ती वाढून आता 614.23 कोटी रुपये झाली आहे.
काय आहे प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज -
Prozone Intu Properties ही डेट फ्री कंपनी आहे. याचाच अर्थ या कंपनीवर कोणतंच कर्ज नाही. या कंपनीची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तसेच कंपनीचे महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि तमिळनाडूतील कोइमतूरमध्ये शॉपिंग सेंटर्स आहेत. भविष्यात नागपूर आणि मुंबईत शॉपिंग सेंटर सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.
केवळ 5 हजार गुंतवून मिळवा 50000, या व्यवसायासाठी मोदी सरकारही करत आहे मदत
डिसेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून 45 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीची तोटा 2.7 कोटी रुपये होता. त्याचवेळी एकूण उत्पन्न 73 टक्क्यांनी घसरून 17.93 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 67.27 कोटी रुपये होतं.
(Disclaimer: या बातमीद्वारे कुठल्याही प्रकारे शेअर मार्केटसंबंधी सल्ला देण्यात आलेला नाही. फक्त शेअर बाजारातल्या चढ-उतारांनुसार लक्षात आलेली आकडेवारी आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Share market, Stock Markets