जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM मधून पैसे काढण्यासाठी येणार 5000 रुपयांची मर्यादा, RBI ने आखला नवा प्लॅन

ATM मधून पैसे काढण्यासाठी येणार 5000 रुपयांची मर्यादा, RBI ने आखला नवा प्लॅन

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : तुम्ही ATM चा वापर फक्त शॉपिंग किंवा पैसे काढण्यासाठी केला असेल. मात्र जर तुमच्याकडे RuPay चे एटीएम कार्ड असेल तर ही आनंदाची बाब आहे. संकटकाळात हे कार्ड तुमच्या उपयोगात येईल.

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : तुम्ही ATM चा वापर फक्त शॉपिंग किंवा पैसे काढण्यासाठी केला असेल. मात्र जर तुमच्याकडे RuPay चे एटीएम कार्ड असेल तर ही आनंदाची बाब आहे. संकटकाळात हे कार्ड तुमच्या उपयोगात येईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India RBI) नेमण्यात आलेल्या समितीने एटीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहासाठी असणारे इंटरचेंज शूल्क वाढवण्याचे सूचवले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India RBI) नेमण्यात आलेल्या समितीने एटीएमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहासाठी असणारे इंटरचेंज शूल्क वाढवण्याचे सूचवले आहे. मनीलाइफने याबाबत वृत्त दिले आहे. अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, या समितीने असे सुचवले आहे की एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा एका ट्रान्सॅक्शनसाठी 5 हजार करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीला यापेक्षा जास्त पैसे काढायचे असतील, तर त्यावर शूल्क आकारण्यात यावे. 6 जून 2019 च्या पतधोरण घोषणेनुसार आरबीआयने एटीएम इंटरचेंज फी संरचनेचा आढावा घेण्यासाठी भारतीय बँक असोसिएशन (आयबीए) चे मुख्य कार्यकारी (सीईओ) व्ही.जी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीचा हा अहवाल हैदराबादमधील श्रीकांत एल. यांना माहिती अधिकाराच्या अखत्यारित मिळाला आहे. मीडिया अहवालात असे सांगण्यात आले आहे की, ही समितीची गेल्या वर्षी नेमणूक करण्यात आली होती. एटीएमचे इंटरचेंज शूल्क, त्याचा एकंदरित आराखडा याबाबत अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापण्यात आली होती. या समितीचा अहवाल आरबीआयकडे सोपवण्यात आला असून, आता हे केंद्रीय बँकेच्या हातात आहे की ते या समितीच्या शिफारसी स्वीकारतील की नाही. (हे वाचा- 90 दिवसांनतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा? नागरी उड्डाण मंत्र्यांचे संकेत ) मीडिया अहवालानुसार, समितीने अशी शिफारस केली होती की, आर्थिक व्यवहारांसाठी (Financial Transaction) शूल्क 16 टक्क्यांनी किंवा 2 रुपयांनी वाढवले जावे, म्हणजेच 15 वरून 17 रुपये केले जावे. तर गैर-आर्थिक व्यवहारांसाठी (Non-Financial Transation) हे शूल्क 5 रुपयांवरून 7 रुपये करण्यात  यावे. 1 मिलियन किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सेंटरमधील एटीएमसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या इतर केंद्रांवर एटीएम वापरण्यासाठी समितीने शुल्क वाढवून 24 टक्के करण्याची शिफारस केली आहे. (हे वाचा- पॅन-आधार लिंक करण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक, अन्यथा असा बसेल आर्थिक फटका )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rbi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात