नवी दिल्ली, 23 जून : देशामध्ये मार्च महिन्यापासून बंद असणारी देशांतर्गत विमान वाहतूक 25 मेपासून सेवा सुरू झाली आहे. कालांतराने जून महिन्यापर्यंत प्रवासीसंख्या देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Aviation Minister Hardeep Puri) यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत एक महत्त्वाचे ट्वीट केले आहे. त्यांनी यामध्ये असं म्हटलं आहे की, विमान प्रवासातील देशांतर्गत रहदारी 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करता येतील.
We can start regular international flights when our domestic traffic reaches about 50-60% & other countries open up to international traffic without present conditionalities.
Once the situation evolves in that direction we will consider a calibrated opening.@MoCA_GoI
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळामध्ये भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. साधारण तीन महिन्यापासून ही सेवा बंद आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत (Vande Bharat Mission) अंतर्गत परदेशातून विमानं भारतामध्ये येत आहेत. मात्र यामध्ये केवळ परदेशामध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना देशात परत आणण्याचे काम सुरू आहे. पॅसेंजर फ्लाइटच्या स्वरूपात या फ्लाइट्स उड्डाण घेत नाही आहेत. अशावेळी लॉकडाऊनच्या आधी भारतात आलेले देखील काही नागरिक आहेत, ज्यांना कामासाठी परत परदेशात जावे लागणार आहे. मात्र फ्लाइट्स बंद असल्यामुळे ते शक्य नाही आहे.
अशावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेले ट्वीट आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत असू शकतात. कोरोनाच्या या संकटकाळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यास प्रवासी, क्रू मेंबर्स, विमानतळ कर्मचारी यांच्यासाठी काही नवीन नियम असतील. सर्वात आधी जे देश त्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करतील, त्याठिकाणीच आपल्या देशातील विमानं पोहचू शकतील. त्याचप्रमाणे प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असेल