जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RBI Cancels Bank License: RBI ची मोठी कारवाई, या बँकेचं लायसन्स केलं रद्द, आता खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

RBI Cancels Bank License: RBI ची मोठी कारवाई, या बँकेचं लायसन्स केलं रद्द, आता खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

RBI Cancels Bank License: RBI ची मोठी कारवाई, या बँकेचं लायसन्स केलं रद्द, आता खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे

    नवी दिल्ली, 9 जून : सहकारी बँका (Co-operative Banks) खरं तर स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या आधार असतात; पण अनेकदा या सहकारी बँकांमधल्या घोटाळ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतात. आताही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकातल्या एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने कर्नाटकातल्या बागलकोटमधल्या मुधोळ सहकारी बँकेचं (Mudhol Co Operative Bank) लायसन्स रद्द केलं आहे (RBI Cancels Bank License). ‘झी न्यूज’ने याबाबतचं अधिक वृत्त दिलं आहे. 8 जूनपासून हे लायसन्स रद्द करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. ठेवींची परतफेड करण्यास आणि रोख रक्कम घेण्यासही मुधोळ सहकारी बँकेवर बंदी घालण्यात आली आहे. आता या कारवाईनंतर ठेवीदार या बँकेत पैसे जमा करू शकणार नाहीत किंवा काढूही शकणार नाहीत. ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? सर्वसामान्य ग्राहकांना आपल्या पैशांचं काय होणार हा मोठा प्रश्न पडला आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे खातेदारांना परत मिळू शकतात. केंद्राच्या नियमानुसार ज्या ग्राहकांचे पैसे बँकेत जमा आहेत, ते विमा आणि क्रेडिट गॅरंटी प्राधिकरणाच्या नियमानुसार (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation-DICGC) आपले पैसे परत मिळवू शकतात. या नियमानुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेला संरक्षण देण्याचा नियम आहे; मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम बँकेत असल्यास ती या माध्यमातून परत मिळू शकत नाही. या अंतर्गत देशात चालविल्या जाणाऱ्या सर्व व्यावसायिक बँकांमध्ये (Commercial Bank) जमा झालेल्या सर्व प्रकारच्या बचत (Savings), फिक्स्ड डिपॉझिट(FD), करंट (Current), मुदत ठेवी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यं/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असणाऱ्या राज्य, केंद्रीय आणि प्राथमिक सहकारी बँकांचा समावेश होतो. म्हणजेच यांपैकी कोणत्याही बँकेवर काही संकट आलं, तरी पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याने त्या ठेवी ग्राहकाला परत मिळू शकतात. मुधोळ बँकेकडे पुरेसा निधी सध्या जमा नाही आणि कोणत्याही उत्पन्नाचीही शक्यता नाही असं भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लायसन्स रद्द करण्याची घोषणा करताना म्हटलं आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांचे पैसे परत द्यायला बँक असमर्थ असल्याचंही RBI ने म्हटलं आहे. यापूर्वीही काही सहकारी बँकांवर अशा प्रकारची कारवाई RBI ने केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कर्जं देणं, आर्थिक घोटाळे, कर्जाची परतफेड करता न येणं अशा कारणांमुळे सहकारी बँकांची आर्थिक स्थिती खालावते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: rbi , बँक
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात