Home /News /money /

तुमचं SBI मध्ये अकाउंट आहे? लगेच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा भरावा लागेल दंड

तुमचं SBI मध्ये अकाउंट आहे? लगेच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा भरावा लागेल दंड

तुमचं SBI मध्ये सेव्हिंग्ज अकाउंट असेल आणि तुम्ही तुमचं पॅन कार्ड तुमच्या खात्याशी लिंक केलं नसेल, तर हे काम त्वरित करून घ्या.

नवी दिल्ली, 23 मे : पॅनकार्ड (PAN Card) हे आजच्या काळात एक महत्त्वाचं डॉक्‍युमेंट झालं आहे. त्याशिवाय कोणतंही आर्थिक काम आता जवळजवळ अशक्य आहे. आयकर रिटर्न (ITR) भरण्यापासून ते बँक खातं उघडणं, व्यवसाय सुरू करणं आणि मालमत्तांची खरेदी-विक्री करणं, यासह अनेक बाबींसाठी पॅन कार्ड आता आवश्यक झालं आहे. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्याशी (Bank Account) लिंक करणं हे एक महत्त्वाचं काम आहे. असं न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. तुमचं SBI मध्ये सेव्हिंग्ज अकाउंट असेल आणि तुम्ही तुमचं पॅन कार्ड तुमच्या खात्याशी लिंक केलं नसेल, तर हे काम त्वरित करून घ्या. इंटरनेट बँकिंगद्वारे SBI बचत खात्याशी पॅन कार्ड कसं लिंक करावं हे जाणून घ्या. एसबीआयच्या बचत खात्याशी असं लिंक करा पॅनकार्ड - - सर्वांत आधी अधिकृत वेबसाइट www.onlinesbi.com ला भेट द्या. - My Accounts मधील Profile-PAN Registration वर जा. - अकाउंट नंबर आणि पॅन क्रमांक निवडा आणि सबमिटवर (Submit) क्लिक करा. - तुमची Request आता SBI शाखेकडे प्रॉसेसिंगसाठी पाठवली जाईल. - तुमच्या Request वर 7 दिवसांच्या आत प्रक्रिया केली जाईल. - लिंकिंगच्या स्थितीबद्दल तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर माहिती दिली जाईल. असं करा SBI शाखेला भेट देऊन सेव्हिंग अकाउंटशी पॅन कार्ड लिंक - - तुमच्या जवळच्या SBI शाखेला भेट द्या. - तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत ठेवा. - Letter of Request अर्ज भरा. - पॅन कार्डच्या झेरॉक्स कॉपीसह तो सबमिट करा. - पडताळणीनंतर (Verification) ही प्रक्रिया पूर्ण होईल. - तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर लिंकिंग स्थितीबद्दल एसएमएस प्राप्त होईल.

हे वाचा - 200 रुपयांच्या SIP द्वारे कसं आणि किती दिवसांत बनू शकता कोट्यधीश, समजून घ्या Calculation

पॅन कार्ड लिंक करण्याबद्दल SBI मेसेज करत नाही - सर्वांत महत्त्वाचं म्हणजे SBI आपल्या ग्राहकांना पॅन कार्ड लिंक करण्यासंदर्भात मेसेज करत नाही. आपण स्वतः ऑनलाइन बँकिंगद्वारे (Online Banking) किंवा बँकेत जाऊन पॅन कार्ड अकाउंट नंबरशी लिंक करण्याची प्रोसेस करावी लागते. अलीकडे एसबीआयच्या नावाखाली फ्रॉड मेसेज (Fraud Message) पाठवून खातेदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. SBI च्या नावाने आलेला मेसेज अगदी खऱ्या मेसेजप्रमाणेच दिसतो. ग्राहकांनाही हा मेसेज बँकेनेच पाठवला असल्याचं वाटतं. त्यामुळे ग्राहक या फेक लिंकवर क्लिक करतात आणि आपले डिटेल्स शेअर करतात. परंतु, ही फेक लिंक असल्याने ग्राहकाचे संपूर्ण डिटेल्स फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि अकाउंट रिकामं होतं. परंतु, SBI ने वारंवार सांगितलंय की, ते अशाप्रकारे ग्राहकांना मेसेज करत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका. नाहीतर तुम्ही सायबर चोरीला बळी पडू शकता. तुमचे डिटेल्स कोणत्याही लिंकवर शेअर करू नका. पॅन कार्डसंबंधी तक्रार किंवा समस्या असल्यास थेट बँकेशी संपर्क करा.
First published:

Tags: Pan card, SBI, Sbi account, SBI Bank News, State bank of india

पुढील बातम्या