मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI Hike Repo Rate: रेपो दरवाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल? किती खर्च वाढणार?

RBI Hike Repo Rate: रेपो दरवाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल? किती खर्च वाढणार?

मे महिन्याच्या सुरुवातीला, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आरबीआयने पूर्व सूचना न देता एमपीसीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

मे महिन्याच्या सुरुवातीला, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आरबीआयने पूर्व सूचना न देता एमपीसीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

मे महिन्याच्या सुरुवातीला, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आरबीआयने पूर्व सूचना न देता एमपीसीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

मुंबई, 8 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरात (Repo Rate) सलग दुसऱ्या महिन्यात वाढ करण्याची घोषणा करून एकप्रकारे धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरवाढीचा निर्णय घेतल्याचे आरबीआयने सांगितले आहे.

रेपो दरवाढीचा काय परिणाम होईल?

रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देते. म्हणजेच RBI कडून कर्ज घेतल्यावर बँकांना आता 4 टक्क्यांऐवजी 4.90 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. जेव्हा बँकांना जास्त व्याज द्यावे लागते, तेव्हा त्या ग्राहकांकडून कर्जावर जास्त घेणार. म्हणजेच रेपो रेट वाढवल्याचा परिणाम असा होणार आहे की, येत्या काळात सरकारपासून ते देशातील खासगी बँकांपर्यंत, गृहकर्जापासून ते कार कर्जापर्यंत, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे आणि इतर सर्वच कर्ज महाग होतील. त्यामुळे तुम्ही ज्या जुन्या कर्जावर चालत आहात त्याचा EMI देखील वाढेल.

RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार

महागाईबाबत चिंता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की, महागाई सातत्याने वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पुरवठा समस्यांमुळे महागाई वाढली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. जगभरातील आर्थिक घडामोडींमध्ये मंदी आली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात महागाईचा ताण वाढत आहे. शेतमाल बाजारातही घट झाली आहे.

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम?

गेल्याच महिन्यात 0.40 टक्क्यांची वाढ

मे महिन्याच्या सुरुवातीला, देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आरबीआयने पूर्व सूचना न देता एमपीसीची बैठक आयोजित केली होती आणि त्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2020 पासून 4 टक्क्यांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर राहिल्यानंतर, हे दर अचानक 4.40 टक्क्यांपर्यंत वाढले. या वाढीनंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनेही जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो दरांमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत दिले होते.

First published:
top videos

    Tags: Rbi latest news, Repo rate, Shaktikanta das