मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना झटका; सर्व प्रकारचे लोन महागले, EMI चा बोजाही वाढला

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना झटका; सर्व प्रकारचे लोन महागले, EMI चा बोजाही वाढला

PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता.

PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता.

PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 1 जून : रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर (Loan Interest Rates) वाढवले ​​आहेत. SBI, HDFC सह सर्व बँकांनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपला MCLR वाढवला आहे.

PNB ने म्हटले की, आजपासून (1 जून) MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. नवे दर आजपासून लागू झाले असून त्याचा परिणाम गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासह (Home loan, Personal Loan, Car Loan) सर्व प्रकारच्या कर्जांवर दिसून येईल. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर वाढवले ​​होते.

HDFC चे 100 खातेधारक काही सेकंदात बनले 130 कोटींची मालक; अन्...

कर्जावर किती व्याज आहे?

PNB ने सांगितले की नवीन दर लागू झाल्यानंतर, एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आता 7.40 टक्के झाला आहे, जो आतापर्यंत 7.25 टक्के होता. या बँकेची बहुतांश कर्जे केवळ MCLR वर आधारित आहेत, त्यामुळे त्या कर्जांचे हप्तेही आता वाढणार आहेत.

खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर एका दिवसाच्या कर्जावरील नवीन दर 6.60 वरून 6.75 टक्के झाला आहे. एक महिन्याचा MCLR आता 6.80 टक्के आहे, जो पूर्वी 6.65 टक्के होता. याशिवाय, एक महिन्याचा MCLR देखील 0.15 टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याचा नवीन दर आता 6.90 टक्के झाला आहे, जो पूर्वी 6.75 टक्के होता. बँकेने 6 महिन्यांच्या कर्जावरील व्याजदरही 7.10 टक्के केला आहे. बँकेने तीन वर्षांच्या कर्जावरील MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून 7.70 टक्के केला आहे.

First published:

Tags: Home Loan, Pnb, Pnb bank