मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2021 मध्ये 25% ने कोसळला हा स्टॉक तरी Vijay Kedia यांनी वाढवली भागीदारी, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

2021 मध्ये 25% ने कोसळला हा स्टॉक तरी Vijay Kedia यांनी वाढवली भागीदारी, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

विजय केडियांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर यावर्षी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे.

विजय केडियांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर यावर्षी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे.

विजय केडियांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर यावर्षी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 24 ऑक्टोबर: एखाद्या कंपनीचे शेअर उतरत (Share Market News) असले तर त्यातील गुंतवणूक कमी केली जाते, हा साधा फंडा वापरुन अनेकजण गुंतवणूक करत असतात. दरम्यान गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओतील (Vijay  Kedia Portfolio) एक स्टॉक अनेकांसाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाता, तेव्हा सर्वोत्तम उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. हेच धोरण शेअर बाजारासाठीही लागू आहे. जेव्हा कोविडच्या प्रादुर्भावानंतर बाजार कोसळत होता, तेव्हा शीर्ष गुंतवणूकदार कमी किमतीत दर्जेदार स्टॉक खरेदी करत होते. विजय केडिया यांनी गेल्या एका वर्षात शून्य परतावा देणार्‍या रॅमको सिस्टीम्समध्‍ये (Ramco Systems share price) स्‍टेक वाढवल्‍याने अशी शेअर खरेदी अजूनही सुरूच आहे असे दिसते.

विजय केडियांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर यावर्षी 2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे. विजय केडिया यांनी नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत रॅमको सिस्टीममधील आपला हिस्सा 1.81 टक्क्यांवरून 2.56 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

वाचा-एकेकाळी याठिकाणी होती दरोडेखोरांची दहशत, आज जवळपास 80 महिला बनल्यात 'आत्मनिर्भर'

Ramco Systems च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, विजय केडिया यांच्याकडे जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत कंपनीचे 7,87,663 शेअर्स अर्थात 2.56 टक्के स्टेक होते. त्याचबरोबर, एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत विजय केडियांकडे या कंपनीचे 5,56,034 शेअर्स होते. ही भागीदारी कंपनीने जारी केलेल्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 1.81 टक्के होती. मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्यानंतरही Q2FY22 मध्ये विजय केडिया यांनी सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीत 2,31,629 शेअर्स किंवा 0.75 टक्के भाग खरेदी केले आहेत.

वाचा-तुमचे PF चे पैसे येतील धोक्यात जर शेअर केला यापैकी कोणताही नंबर, EPFO कडून अलर्ट

विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओचा समावेश असलेल्या या शेअरच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली आहे. या कालावधीत 8.50 टक्क्यांच्या घसरणीसह हा शेअर गेल्या एका महिन्यात 498.40 रुपयांवरून 456 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, रॅमको सिस्टिम्सच्या शेअरची किंमत सुमारे 505 रुपयांच्या पातळीवरून घसरून 456 रुपयांवर आली आहे म्हणजेच या कालावधीत शेअर्सची किंमत सुमारे 10 टक्क्यांनी घसरली आहे. त्याचप्रमाणे, या वर्षभरात हा शेअर 600 रुपयांवरून 456 रुपयांपर्यंत खाली आला आहे, ज्यामुळे 2021 मध्ये हा शेअर सुमारे 25 टक्क्यांनी घसरला आहे.

विजय केडिया यांच्या मालकीच्या या शेअरने गेल्या वर्षातही शून्य परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात Ramco Systems च्या शेअरची किंमत 476 रुपयांवरून 456 रुपये प्रति शेअरवर आली आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये जवळपास 4 टक्के घट झाली आहे.

First published:

Tags: Share market