मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एकेकाळी याठिकाणी होती दरोडेखोरांची दहशत, आज जवळपास 80 महिला बनल्यात 'आत्मनिर्भर'

एकेकाळी याठिकाणी होती दरोडेखोरांची दहशत, आज जवळपास 80 महिला बनल्यात 'आत्मनिर्भर'

इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, याची प्रचिती उत्तर प्रदेशमधील या महिलांच्या कामातून मिळते आहे. जवळपास 80 महिला याठिकाणी आत्मनिर्भर बनल्या आहेत.

इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, याची प्रचिती उत्तर प्रदेशमधील या महिलांच्या कामातून मिळते आहे. जवळपास 80 महिला याठिकाणी आत्मनिर्भर बनल्या आहेत.

इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, याची प्रचिती उत्तर प्रदेशमधील या महिलांच्या कामातून मिळते आहे. जवळपास 80 महिला याठिकाणी आत्मनिर्भर बनल्या आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: महिलांनी इतर कुणावरही अवलंबून न राहता स्वबळावर उभ राहून पोटाची खळगी भरली पाहिजे, असा विचार अनेकदा आपल्या मनात येतो. महिला सबलीकरणासाठी (Woman Empowerment) अनेक संस्थाही पुढाकार घेतात. मात्र कठीण परिस्थितीतून पुढे जात देशातील काही महिलांनी सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्या स्वबळावर उभ राहून 'आत्मनिर्भर' (Aatmanirbhar Bharat) तर बनल्या आहेत पण त्यांनी त्याकरता वेगळ्या वाटा देखील निवडल्या आहेत. गंगा नदी आणि रामगंगेच्या तीरावर असणाऱ्या गावातील महिलांची कहाणीही अशीच काहीशी प्रेरणादायी आहे.

याठिकाणच्या गावांतील सुमारे 80 महिलांचा समूह लाइट बल्ब आणि दिवे बनवायला शिकत आहे. उत्तर प्रदेशच्या या भागात पूर्वी दरोडेखोरांची दहशत होती. आज शाहजहानपूरच्या भारतीय उद्योग संघटनेच्या पुढाकाराने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

वाचा-Work From Home लवकरच संपणार! काय आहे TCS, Wipro आणि Infosys चा प्लॅन?

बेरोजगार महिला होत आहेत 'आत्मनिर्भर'

जिल्हा दंडाधिकारी विक्रम सिंह यांनी अशी माहिती दिली आहे  की, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे येथील कुटीर उद्योगांना चालना मिळेल. हा उपक्रम विलक्षण असल्याचे सांगून सिंह म्हणाले की, याद्वारे चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. यामुळे बेरोजगार महिलांना आत्मनिर्भर होण्यासही मदत होईल.

वाचा-दिवाळी शॉपिंग करतानाच व्हाल मालामाल! 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

दरोडेखोरांची होती दहशत

भारतीय इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले की, हा उपक्रम शाहजहांपूर येथून सुरू झाला असून सध्या 80 महिलांचा यात सहभाग आहे. या महिला गंगा नदी आणि रामगंगा भागातील गावांतून आलेल्या आहेत, जिथे एकेकाळी दरोडेखोरांची दहशत होती. या महिलांना लखनऊचे ट्रेनर विवेक सिंग प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांना दिवाळीसाठी बल्ब, दिवे बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने थेट मोठ्या कंपन्यांकडून खरेदी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या उत्पादनांसाठी कंपन्यांकडून कच्चा माल पुरवला जाणार आहे. अग्रवाल म्हणाले की, हा उपक्रम सध्या राज्यभरात राबवला जाईल. त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल.

First published:

Tags: Small business