नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून त्यांच्या सहा कोटी खातेधारकांना विविध गोष्टींविषयी अलर्ट (EPFO Alert) पाठवला जातो. आता देखील EPFO ने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेकडे दूर्लक्ष करणं तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. तुमचा UAN, PAN, Aadhar क्रमांक कोणत्याही व्यक्तीसह शेअर करण्याबाबत संघटनेने ईपीएफओ सदस्यांना अलर्ट पाठवला आहे. कंपनीने ग्राहकांना ट्विटरच्या माध्यमातून सावध केले आहे. ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेदारांकडून UAN नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही’. या ट्वीटमध्ये पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये EPFO ने म्हटलं आहे की, फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. EPFO कधीच फोन, सोशल मीडिया, WhatsApp च्या माध्यमातून UAN नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर, बँक तपशील ओटीपी यासारखे नंबर्स विचारत नाही. कोणत्याही सेवेसाठी EPFO सोशल मीडिया, WhatsApp च्या माध्यमातून पैसे डिपॉझिट करण्यास सांगत नाही.
#EPFO never asks its members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media.#SocialSecurity #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @PIB_India @PIBHindi @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @mygovindia @PTI_News pic.twitter.com/kG6UQ5O3mb
— EPFO (@socialepfo) October 23, 2021
…अन्यथा होईल मोठे नुकसान होईल अशा परिस्थितीत ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क राहा. यासोबतच ईपीएफओने फेक वेबसाइट टाळण्याचा सल्लाही दिला आहे. शिवाय कोणत्याही माहित नसणाऱ्या सोअर्सवरून कोणतही App डाऊनलोड करणंही संकटांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. जर तुम्ही EPFO च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमची फसवणूक होऊ शकते. वाचा- खरेदी करता येईल खिशाला परवडणारं स्वत:चं घर, PNB देत आहे संधी बँकाही वेळोवेळी अलर्ट जारी करतात विविध बँका देखील आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज अलर्ट जारी करत असते. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत असते. बँकांकडूनही अशाप्रकारच्या बनावट कॉल्स, SMS, मेल्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला जातो.