मराठी बातम्या /बातम्या /मनी /

स्वस्तात मिळत आहेत Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स, बंपर रिटर्नची अपेक्षा

स्वस्तात मिळत आहेत Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स, बंपर रिटर्नची अपेक्षा

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Stock Market) घसरण सुरू आहे. त्यामुळे काही स्टॉक स्वस्तात मिळत आहेत. इथे तुम्ही राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) अशा स्टॉकबद्दल  जाणून घेणार आहात ज्यावर डिस्काउंट मिळते आहे

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Stock Market) घसरण सुरू आहे. त्यामुळे काही स्टॉक स्वस्तात मिळत आहेत. इथे तुम्ही राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहात ज्यावर डिस्काउंट मिळते आहे

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Stock Market) घसरण सुरू आहे. त्यामुळे काही स्टॉक स्वस्तात मिळत आहेत. इथे तुम्ही राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहात ज्यावर डिस्काउंट मिळते आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Stock Market) घसरण सुरू आहे. त्यामुळे काही स्टॉक स्वस्तात मिळत आहेत. इथे तुम्ही राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील (Rakesh Jhunjhunwala Portfolio) अशा स्टॉकबद्दल  जाणून घेणार आहात ज्यावर डिस्काउंट मिळते आहे. हे स्टॉक्स वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊसच्या आवडत्या स्टॉक्सच्या यादीत आहेत. यामध्ये मुख्यत्वे 4 मोठे शेअर्स आहेत. टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications Share Price), ओरिएंट सीमेंट (Orient Cement Share Price), एनसीसी लिमिटेड (NCC Ltd. Share Price) आणि लूपिन लिमिटेड (Lupin Limted Share Price) या स्टॉक्सचा यात समावेश होत आहे.

टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications)

टाटा कम्युनिकेशन्स हा टाटा ग्रुपचा शेअर आहे. 19 ऑक्टोबर 2021 रोजी हा शेअर 1540 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. दरम्यान 22 नोव्हेंबर 2021 रोजी हा स्टॉक  1,222 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने या स्टॉकमध्ये पोझिशन बनवण्याचा सल्ला दिला आहे आणि याकरता 1700 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. अर्थात येणारा काळात हा स्टॉक जवळपास 39 टक्के रिटर्न देऊ शकतो. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीतील 1.1 टक्के भागीदारी आहे आणि याची व्हॅल्यू 381.3 कोटी रुपये सांगण्यात आली आहे.

हे वाचा-Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी इलॉन मस्कसोबत केली स्वत:ची तुलना, कारण..

ओरिएंट सिमेंट (Orient Cement)

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे ओरिएंट सिमेंट कंपनीत 1.2% भागीदारी आहे आणि त्यांच्या शेअर्सची किंमत 40 कोटी रुपये आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने या स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, सध्या ₹ 157.40 वर ट्रेड करत असलेला हा स्टॉक काही वेळेत 30% पर्यंत परतावा देऊ शकतो. यासाठी ₹ 210 चे लक्ष्य देण्यात आले आहे. ओरिएंट सिमेंटने 8 नोव्हेंबर रोजी NSE वर 185.55 चा उच्चांक सेट केला होता.

एनसीसी लिमिटेड  (NCC Ltd.)

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील NCC लिमिटेडच्या स्टॉकने 9 फेब्रुवारी 2021 रोजी 99.85 रुपयांचा उच्चांक गाठला. 22 नोव्हेंबर 2021 रोजी हा स्टॉक Rs 74.60 वर बंद झाला आहे. त्यामुळे हा स्टॉक साधारण 25 टक्क्यांन घसरला आहे. ब्रोकरेज हाऊस जिओजितने या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे आणि 103 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजे 37 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो. राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत 12.8 टक्के हिस्सा आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे 78,333,266 शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्य 589 कोटी रुपये आहे.

हे वाचा-Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, काय आहेत नवे दर?

लुपिन लिमिटेड (Lupin Limted)

सध्या या कंपनीचा शेअर रु. 880 वर ट्रेडिंग करत आहे. दरम्यान कंपनीचा शेअर 1 वर्षातील उच्चांकी पातळी रु. 1268 वर देखील पोहोचला होता. 5 दिवसांत स्टॉकमध्ये सुमारे 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्रोकरेज हाऊस शेअरखानने स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि 1210 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या किंमतीनुसार, हा स्टॉक 26 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो राकेश झुनझुनवाल यांची कंपनीत एक टक्क्यापेक्षा कमी भागीदारी आहे.

(Disclaimer: याठिकाणी नमूद केलेले स्टॉक ब्रोकरेज हाऊसेसच्या सल्ल्यावर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कृपया प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हाला होणाऱ्या नफा किंवा तोट्यासाठी News18 जबाबदार नाही. होईल. )

First published:

Tags: Investment, Money, Share market