जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, काय आहेत नवे दर?

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, काय आहेत नवे दर?

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, काय आहेत नवे दर?

सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 262 रुपयांनी घसरून 44,837 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,949 रुपये झाला. याशिवाय 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 48,753 रुपये होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण (Gold-Silver rate drop) नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 286 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव (Gold Rate today) 48,959.00 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव (Silver Rate today) 759.00 रुपयांनी घसरला आहे. चांदी 65,727.00 वर व्यवहार करत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 262 रुपयांनी घसरून 44,837 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,949 रुपये झाला. याशिवाय 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 48,753 रुपये होती. तर 18 कॅरेटचा भाव 36,712 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 28635 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 65,727 रुपये होता. Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा? सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. नोकरी बदलताना PF अकाऊंट ट्र्रान्सफर करण्याची गरज नाही, EPFO चा निर्णय सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात