मुंबई, 22 नोव्हेंबर : पेटीएमच्या शेअरमधील घसरण दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. One 97 Communications Ltd चे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा (VIjay Shakhar Sharma) यांनी पेटीएमच्या आयपीओच्या (Paytm IPO) अपयशानंतर टेस्लाशी (Tesla Inc.) तुलना करून स्वत: आणि एलोन मस्क यांच्यात समांतरता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
पेटीएमची सुरुवात शेअर बाजारात (Share Market) खूप कमजोरी झाली. डिस्काउंटवर लिस्ट झाल्यापासून त्यात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी शेअर 27 टक्क्यांनी घसरला होता. यामुळे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी आपल्या कर्मचार्यांना उत्साही करण्यासाठी 4 तास टाऊन हॉल आयोजित केला होता. टाऊन हॉलमध्ये उपस्थित असलेल्यांनी सांगितले की विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या कर्मचार्यांना शेअरच्या सुरुवातीच्या पडझडीला मागे सोडून पुढील योजनांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले.
One 97 Communications ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. इलॉन मस्कचे (Elon Musk) कौतुक करताना विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट केले होते की, इलॉन मस्कने टेस्ला कार खरेदी करणे ही एक आनंदाची गोष्ट आहे. विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या कर्मचार्यांना आठवण करून दिली की इलेक्ट्रिकल व्हेहिकल मेकर टेस्लाचा स्टॉक हा संपूर्ण जगात सर्वाधिक विक्रीचा दबाव झेललेला स्टॉक होता. परंतु कंपनीने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मजबूत पावलं उचलली आणि ती आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. आज टेस्ला ही जगातील सर्वात वॅल्यूएबल ऑटो मेकर कंपनी आहे.
Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट
एक दिवस आपलाही येईल
इतिहासावर नजर टाकल्यास, 2010 मध्ये IPO नंतर लिस्टच्या दिवशी टेस्लाचे शेअर्स 41 टक्क्यांनी वाढले होते. त्यानंतर Telsa चे शेअर्स प्रति शेअर 4 डॉलरच्या खालीही गेले होते. यानंतर त्यात सातत्याने वाढ होत असून आता कंपनीचे मार्केट वॅल्युएशन 1 लाख डॉलरवर पोहोचले आहे. विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, एक दिवस आपलाही येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Paytm, Share market