Home /News /money /

7th Pay Commission: दिवाळी होणार गोड! केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 ठिकाणाहून मिळणार पैसे; मोदी सरकार जारी करणार पैसे

7th Pay Commission: दिवाळी होणार गोड! केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 ठिकाणाहून मिळणार पैसे; मोदी सरकार जारी करणार पैसे

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खूप खास असणार आहे. यावर्षी दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना तीन गिफ्ट मिळणार आहेत.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: तुम्ही जर केंद्र सरकारी कर्मचारी (Good News for central government employees) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मोदी सरकारकडून तुम्हाला मोठ गिफ्ट दिवाळीआधीच मिळू शकतं. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खूप खास असणार आहे. यावर्षी दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना तीन गिफ्ट मिळणार आहेत. पहिलं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance DA) पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. दुसरं म्हणजे डीए थकबाकीबाबत (Dearness Allowance Arrears) सरकारशी सुरू असलेल्या चर्चेबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र, सरकार अद्याप थकबाकी देण्याच्या बाजूने नाही. तिसरे महत्त्वाचे अपडेट म्हणजे पीएफवरील व्याज (Interest on PF Balance) दिवाळीपूर्वी (Diwali 2021 Gift) खात्यात जमा होऊ शकते. पुन्हा वाढणार DA जुलै 2021 साठी महागाई भत्ता (डीए) अद्याप निश्चित झालेला नाही, परंतु जानेवारी ते मे 2021 साठी एआयसीपीआय डेटा दर्शवितो की त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. अशा प्रकारे, 3 टक्क्यांनी वाढ झाल्यास महागाई भत्ता 31 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार दसरा किंवा दिवाळीच्या आसपास डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. वाचा-LIC Mutual Fund मधून पैसे कमावण्याची संधी, फक्त 15 दिवस सुरू राहणार LICचा हा फंड DA एरियर मिळण्याची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की 18 महिने थांबवण्यात आलेला  महागाई भत्ता त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल. आता 18 महिन्यांपासून प्रलंबित एरियरची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम मोदी यावर लवकरात लवकर उपाय शोधू शकतात. त्यांना दिवाळीपर्यंत 18 महिने थांबवण्यात आलेला महागाई भत्ता मिळू शकतो. कोविड -19 साथीच्या आजारामुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत डीए वाढ थांबवली होती. त्यानंतर डीए वाढीची घोषणा करण्यात आली पण अद्याप एरिअर देण्यात आलेला नाही. वाचा- Nykaa IPO ला देखील SEBI ची मंजुरी! 4000 कोटींचा फंड उभारणार कंपनी, कमाईची संधी पीएफ व्याजाचे पैसे लवकरच येतील कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) 6 कोटीहून अधिक खातेदारांना लवकरच ही आनंदाची बातमी मिळू शकते. दिवाळीपूर्वी ईपीएफओकडून त्यांच्या सदस्यांना ही बंपर भेट मिळू शकते. पीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे लवकरच हस्तांतरित केले जाऊ शकतात. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Salary

    पुढील बातम्या