• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ, खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ, खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

कॅनरा बँकेने (Canera Bank) 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल (Canera Bank Q2 Result) जाहीर केले आहेत. या कालावधीत बँकेचा नफा 1332.6 कोटी रुपये झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolia) यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या नवीन शेअरपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेबद्दल (Canera Bank Share) ब्रोकरेज हाऊसेस उत्साही दिसत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, कॅनरा बँकेचे शेअर्स BSE वर जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 214 रुपयांवर गेले. कॅनरा बँकेने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत बँकेचा नफा 1332.6 कोटी रुपये झाला आहे. तर तो अंदाजे 1184 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न (NII) 6274 कोटी रुपये होते. New IPO : पुढील महिन्यात आणखी एका मोठ्या कंपनीचा IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी शेअर्स 21 महिन्यांच्या उच्चांकावर आजच्या ट्रेडिंग सत्रात कॅनरा बँकेचा शेअर 9.57 टक्क्यांनी वधारला आहे. कॅनरा बँकेचा शेअर 214.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. या तेजीनंतर कॅनरा बँकेचा शेअर 21 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) मंगळवारी निकाल नोटमध्ये PSU बँकेच्या स्टॉकवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, त्याची टार्गेट प्राईज 270 प्रति शेअर आहे. LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा राकेश झुनझुनवाला यांच्याकड़े 1.60 टक्के हिस्सेदारी BSE वरील कॅनरा बँकेच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, 'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ बाजारातील सहभागींद्वारे ट्रॅक केला जातो. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2021 पर्यंत 1.60 टक्के स्टेक किंवा 2,90,97,400 शेअर्स आहेत. SEBI चा मोठा निर्णय! आता या लोकांना करता येणार नाही ट्रेडिंग, वाचा निर्बंधाचं कारण (Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
  Published by:Pravin Wakchoure
  First published: