• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SEBI चा मोठा निर्णय! आता या लोकांना करता येणार नाही ट्रेडिंग, वाचा निर्बंधाचं कारण

SEBI चा मोठा निर्णय! आता या लोकांना करता येणार नाही ट्रेडिंग, वाचा निर्बंधाचं कारण

Mutual Fund Trading बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंडातील ट्रेडिंगबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता म्युच्युअल फंड कंपनीचे कर्मचारी, विश्वस्त आणि संचालक मंडळाचे सदस्य ट्रेडिंग करू शकणार नाहीत.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर: Mutual Fund Trading बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI New Rule) ने ट्रेडिंगबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता म्युच्युअल फंड कंपनीचे कर्मचारी, विश्वस्त आणि संचालक मंडळाचे सदस्य ट्रेडिंग करू शकणार नाहीत. सेबीने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात यामध्ये माहिती दिली आहे. शिवाय हे निर्बंध अशा व्यक्तींवरही लागू होतील ज्यांच्याकडे कंपनीबद्दल कोणतीही माहिती आहे आणि त्यामुळे कंपनीचे निव्वळ मूल्य, मालमत्ता आणि युनिट धारकांचे हित प्रभावित होऊ शकते. बाजार नियामकाने 'अॅक्सेस पर्सन'ची एक श्रेणी तयार केली ज्यांच्यावर निर्बंध लागू होतील. अॅक्सेस पर्सन्समध्ये मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) चे कार्यकारी संचालक, मुख्य गुंतवणूक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी आणि इतर सी-सूट अधिकारी, निधी व्यवस्थापक, डीलर्स, संशोधन विश्लेषक, ऑपरेशन विभागातील कर्मचारी, अनुपालन अधिकारी आणि प्रमुख यांचा समावेश होतो. हे वाचा-6.5 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, तुम्हाला मिळालं की नाही ते अशाप्रकारे तपासा एएमसी/विश्वस्त कंपनीचे नॉन-एक्सिक्यूटिव्ह डिरेक्टर्स किंवा असे विश्वस्त ज्यांच्या ताब्यात कोणतीही गैर-सार्वजनिक माहिती आहे ज्यामुळे सिक्युरिटीजच्या किंमतीवर, योजनांच्या एनएव्हीवर किंवा युनिट धारकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ती अॅक्सेस पर्सन असेल, अशी माहिती सेबीने दिली आहे. अर्थात या संबंधित व्यक्ती म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करू शकत नाहीत. याबाबतच्या गाइडलाइन्समध्ये शेअर्स, डिबेंचर, बाँड, वॉरंट, डेरिव्हेटिव्ह आणि म्युच्युअल फंड/एएमसी द्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या यूनिट्सची खरेदी किंवा विक्रीचा व्यवहारांचा समावेश आहे. लाइव्ह मिंटने याबाबत वृत्त दिले आहे. हे वाचा-अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; भारतातील टॉप 5 दानशूर व्यक्ती सेबीने 2016 मध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कोणत्याही सिक्युरिटीच्या खरेदी आणि विक्रीतून नफा मिळवण्यापासून रोखले होते. आता जारी करण्यात आलेल्या अॅक्सेस पर्सन्सना ही सवलती दिल्या आहेत. ही सूट आता एका कम्प्लायन्स अधिकाऱ्याद्वारे एका आर्थिक वर्षात दोन वेळा कोणत्याही अॅक्सेस पर्सनला देता येईल. या दरम्यान ते केवळ सिक्योरिटीची विक्री करू शकतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: