मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा

LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा

तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIfe Inurance Corporation) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. LIC Saral Pension Yojana असे या पॉलिसीचे नाव आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 ऑक्टोबर : नोकरी करणाऱ्यांना आता पगार सुरु आहे, मात्र निवृत्तीनंतर काय अशी चिंता त्यांना नक्की सतावत असते. त्यामुळे वृद्धापकाळातही चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आतापासूनच त्यांचं योग्य नियोजन केलं पाहिजे. यासाठी योजना आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIfe Inurance Corporation) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) असे या पॉलिसीचे नाव आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना ही एकच प्रीमियम योजना आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

पेन्शन योजना घेण्याचे दोन पर्याय

सिंगल लाईफ (Single Life)- यामध्ये पॉलिसी एकाच्या नावावर राहील, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

Diwali 2021 मध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींना काजू-बदाम किंवा मिठाई नाही तर द्या खास गिफ्ट! मिळेल आर्थिक सुरक्षा

जॉईंट लाईफ (Joint Life) - यामध्ये दोन्ही जोडीदारांना कव्हरेज असते. जोपर्यंत प्रायमरी निवृत्ती वेतनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना निवृत्ती वेतन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाईल.

दिवाळीआधीच सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज गोल्ड 8330 रुपयांनी स्वस्त

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

>> विमाधारकाची पॉलिसी काढताच त्याची पेन्शन सुरू होईल.

>> आता तुम्हाला पेन्शन दरमहा किंवा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून असेल. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल.

>> ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेता येईल.

>> या योजनेत किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

>> ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे.

>> या प्लॅनमध्ये, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.

First published:

Tags: Investment, LIC, Money