• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • New IPO : पुढील महिन्यात आणखी एका मोठ्या कंपनीचा IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

New IPO : पुढील महिन्यात आणखी एका मोठ्या कंपनीचा IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

Sapphire Foods India चा IPO लवकरच येणार आहे. सफायर फूड्स इंडियाचा IPO 9 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 11 नोव्हेंबरला बंद होईल.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : IPO गुंतवणूकदारांसाठी (Investment in IPO) एक चांगली बातमी आहे. दिवाळीनंतर (Diwali 2021) आणखी एक IPO बाजारात दाखल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. KFC आणि पिझ्झा हट आऊटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods India चा IPO लवकरच येणार आहे. सफायर फूड्स इंडियाचा IPO 9 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 11 नोव्हेंबरला बंद होईल. फर्म 22 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे. याच दिवशी पेटीएमचा आयपीओही (Paytm IPO) येणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो. Sapphire Foods India IPO शी संबंधित इतर माहिती जाणून घेऊया. Diwali 2021 मध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींना काजू-बदाम किंवा मिठाई नाही तर द्या खास गिफ्ट! मिळेल आर्थिक सुरक्षा 50 लाख शेअर्स विकले जातील IPO मध्ये विद्यमान शेअर होल्डर्स आणि प्रमोटर्सकडून 17.57 दशलक्ष शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर आहे. OFS मध्ये, QSR मॅनेजमेंट ट्रस्टद्वारे 8.50 लाख शेअर्स विकले जातील. 5.57 दशलक्ष शेअर्स सॅफायर फूड्स मॉरिशस लिमिटेडद्वारे विकले जातील. तर WWD रुबी लिमिटेडद्वारे 4.85 दशलक्ष शेअर्स विकले जातील. LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा 1500-2000 कोटी रुपये उभारण्याची योजना FY21 साठी, फर्मने एका वर्षापूर्वीच्या 1340.41 कोटीच्या तुलनेत 1,019.62 कोटीच्या ऑपरेशन्समधून महसूल नोंदवला आहे. या कालावधीसाठी निव्वळ तोटा (Net Loss) 99.89 कोटी होता, जो मागील वर्षी 159.25 कोटी होता. एकूण कर्ज 75.66 कोटी रुपये होते. Sapphire Foods India ची IPO द्वारे 1500-2000 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, त्याच्या IPO अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: