मराठी बातम्या /बातम्या /मनी /प्रत्येक वेळी मिळेल कन्फर्म तत्काळ तिकीट! 'या' ट्रिकने 100 टक्के मिळेल यश

प्रत्येक वेळी मिळेल कन्फर्म तत्काळ तिकीट! 'या' ट्रिकने 100 टक्के मिळेल यश

भारतीय रेल्वेचं कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं?

भारतीय रेल्वेचं कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं?

प्रत्येक ट्रेनमध्ये, तत्काळ कोट्यातील सीटची संख्या मर्यादित असते. मात्र याची डिमांड खूप जास्त असते. त्यामुळे बुकिंग विंडो उघडताच सर्व तिकिटे लगेच बूक होतात. आयआरसीटीसी वेबसाइटवरून तिकीट बुक करताना लोकांना अनेकदा वेटिंग तिकीट मिळते. पण काही ट्रिक वापरुन तुम्ही सहज कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 मे : भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ कोट्याद्वारे सीट बुक करणं म्हणजे एक लढाई जिंकण्यापेक्षा कमी नसतं. कारण तत्काळ तिकीट बुकिंग करताना प्रवासांची संख्या जास्त आणि तिकीट मर्यादित असतात. उदाहरणार्थ, सकाळी 10 आणि 11 वाजता, एसी आणि स्लीपर क्लाससाठी, तत्काळ कोट्यासाठी तिकीटांचं बुकिंग सुरु होतं. त्यानंतर 5-10 मिनिटांत वेडिंग येते. विशेषत: जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक केले तर कन्फर्म तत्काळ तिकीट मिळणे जवळजवळ अशक्य आहे. रेल्वे काउंटरवर गर्दी टाळण्यासाठी प्रवासी IRCTC वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतात.

IRCTC मूळ स्टेशनवरुन रेल्वे प्रवास सुरू होण्याच्या तारखेच्या एक दिवस अगोदर तत्काळ तिकिटांसाठी बुकिंग विंडो उघडते. या कोट्याअंतर्गत, प्रत्येक ट्रेनमधील जागांची संख्या मर्यादित आहे आणि बुकिंगची वेळ देखील ठरलेली असते. यासोबतच प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होतं. पण अशा काही ट्रिक आहेत ज्याद्वारे ऑनलाइन तत्काळ तिकीट घरी बसून सहज मिळू शकते. ट्रेनमधील एसी क्लास आणि स्लीपर कॅटेगरीमध्ये तत्काळ तिकीट बुकिंगचा टाइम स्लॉट वेगळा आहे. एसी क्लासेससाठी बुकिंग विंडो सकाळी 10:00 वाजता उघडते, तर नॉन-एसी क्लाससाठी तत्काळ तिकिटे सकाळी 11:00 वाजेपासून बुक करता येतात.

आधीच तयार ठेवा मास्टर लिस्ट

तत्काळ तिकीट बुकिंग करताना नाव, वय, लिंग अशा डिटेल्स भरण्यात वेळ जातो आणि यावेळी सर्व तिकिटे बुक केली जातात. म्हणूनच, जर तुम्हाला हा वेळ वाचवायचा असेल तर IRCTC च्या वेबसाइटवर एक मास्टर लिस्ट पहिलेच तयार करुन ठेवा.

IRCTC Tour Package: फक्त 6 हजार रुपयांत करा वाराणसीची सैर, 4 दिवसांचं स्वस्त टूर पॅकेज

तुम्ही IRCTC च्या My Profile Section मध्ये जाऊन मास्टर लिस्ट तयार करू शकता. येथे तुम्हाला Add/modify Master List वर क्लिक करावं लागेल. यामध्ये प्रवाशाचे नाव, वय, लिंग, सीट, ज्येष्ठ नागरिक आणि आयडी कार्ड नंबर टाकावा लागेल. तुम्ही या लिस्टमध्ये 20 प्रवासी अॅड करु शकता. यानंतर, जेव्हाही तुम्ही IRCTC द्वारे तिकीट बुक कराल तेव्हा पॅसेंजर डिटेल्स पेजवर My Saved Passenger(s) List चा ऑप्शन मिळेल. असं केल्याने, तुम्हाला प्रवासी डिटेल्स वेगळे टाकावे लागणार नाहीत आणि तुमचा वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता आणखी वाढेल.

IRCTC स्वस्तात घडवतेय 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन! तुम्हाला पाणीही घ्यायची गरज नाही

ओटीपी फ्री पेमेंट गेटवे

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बुकिंगसाठी पेमेंट ऑनलाइन मोडद्वारे केले जाते. म्हणजे इंटरनेट बँकिंग किंवा कार्डने केलं जातं. परंतु, इंटरनेट बँकिंग आणि कार्ड पेमेंट दरम्यान ओटीपी व्हेरिफिकेशनमुळे उशीर होतो. अशा परिस्थितीत, तुम्ही ओटीपी-मुक्त पेमेंट गेटवे जसे की रेल्वे ई-वॉलेट, पेटीएम आणि यूपीआय वापरल्यास चांगले. IRCTC वेबसाइटवर तत्काळ तिकीट बुक करताना खूप ट्रॅफिक असते. अशा वेळी बुकिंगसाठी हायस्पीड इंटरनेटची जास्त गरज असते. कारण, वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ लागतो आणि स्पीड कमी असल्यामुळे अनेक वेळा बुकिंगमध्ये अडचणी येतात किंवा बुकिंग दरम्यान पेमेंट फेल होऊ शकते. ज्यामुळे तिकीट बुक होऊ शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Indian railway, Money18, Railway, Railways, Train