धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. IRCTC ने मंदिरे आणि घाटांचे शहर असलेल्या वाराणसीसाठी अतिशय आलिशान आणि किफायतशीर टूर पॅकेज आणलंय. पॅकेजमध्ये तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिर, काल भैरव मंदिर, अन्नपूर्णा घाट, भारत माता मंदिर आणि सारनाथला भेट देण्याची संधी मिळेल.
IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. तुम्ही वाराणसीला फक्त 5,865 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत प्रवास करू शकता. दर सोमवारी जोधपूर आणि जयपूर येथून वाराणसीसाठी ट्रेन सुरू होईल. हे पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेनमध्ये स्लीपर किंवा थर्ड एसीमध्ये प्रवास करता येईल. याशिवाय रोमिंगसाठी कॅब आणि बसची सुविधाही उपलब्ध असेल. रात्रीच्या मुक्कामासाठी आयआरसीटीसीकडून हॉटेलची सुविधाही दिली जाईल.
या टूर पॅकेजचं नाव Varanasi ex Jodhpur/Jaipur (NJR045) असं आहे. डेस्टिनेशन कव्हर वाराणसी आणि सारनाथ आहे. 3 रात्री आणि 4 दिवसांचं हे टूर पॅकेज आहे. दर सोमवारी हे टूर पॅकेज सुरु होतं.
बोर्डिंग/डिबोर्डिंग पॉइंट जोधपुर, राईका बाग, गोटन, मेड़ता रोड, डेगाना जंक्शन, मकराना जंक्शन, कुचामन सिटी, नवा सिटी, सांभर झील, फुलेरा जंक्शन, जयपुर, गांधीनगर जेपीआर, दौसा आणि बांदीकुई जंक्शन आहे. यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल. तुम्ही यामधून ट्रेन आणि कारने प्रवास करु शकता.
या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.