जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IRCTC स्वस्तात घडवतेय 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन! तुम्हाला पाणीही घ्यायची गरज नाही

IRCTC स्वस्तात घडवतेय 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन! तुम्हाला पाणीही घ्यायची गरज नाही

स्वस्तात घ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन

स्वस्तात घ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन

IRCTC ची भारत गौरव ट्रेन 20 मे रोजी कोलकाता येथून सुरू होणार आहे. याअंतर्गत वृद्धांना देशातील प्रमुख 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने वेगवेगळे पॅकेज तयार केलेय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मे : जसजसं वय वाढतं तसं तसं ज्येष्ठांना धार्मिक स्थळांना भेटी द्यायची इच्छा होती. मात्र अनेकदा सोबत कोणी नसल्यामुळे म्हातारे झाल्यावर आवडत्या ठिकाणाला भेट देणे अशक्य वाटते. दरम्यान, झारखंड सरकार एक खास प्लान घेऊन आले आहे. या अंतर्गत ज्येष्ठांना 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता येणार आहे. IRCTC ची भारत गौरव ट्रेन 20 मे रोजी कोलकाता येथून सुरू होणार आहे. याअंतर्गत लोकांना देशातील प्रमुख सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येईल.

News18लोकमत
News18लोकमत

आयआरसीटीसी रांची कार्यालयाचे व्यवस्थापक मुकेश चौधरी यांनी न्यूज18 लोकलला सांगितले की, ट्रेन कोलकाता येथून सुरू होतेय. परंतु ती झारखंडमार्गे धावेल. झारखंडमधील पाकूर आणि साहिबगंज या दोन स्टेशनवर थांबेल. यानंतर वर्धमान, बोलपूर, शांतिनिकेतन, रामपूर हट, कहालगाव, भागलपूर, जमालपूर, किउल, बरौनी, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, हाजीपूर जंक्शन, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, पंडित दीनदयाल उपाध्याय, प्रयागराज आणि छी जंक्शन येथे यात्रेकरूंसाठी गाडी थांबेल.

कोणत्या सुविधा मिळतील?

ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था असणार आहे. असं मुकेश यांनी सांगितलं. यामध्ये सकाळचा नाश्ता ते दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण देखील असेल. ट्रेनमध्ये अनुभवी डॉक्टर्स आणि प्राथमिक उपचारांची संपूर्ण व्यवस्था देखील असणार आहे. जेवण शुद्ध शाकाहारी असेल. यासोबतच प्रति व्यक्ती 2 लिटर पाण्याची बाटली दिली जाईल. यासोबतच आमच्याकडे 150 सदस्यांची टीम आहे जी या लोकांची विशेष काळजी घेणार आहे. ते ज्या स्थानकावर उतरतील तेथून त्यांना हॉटेलमध्ये नेणे आणि तेथून पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा ट्रेनमध्ये बसविण्याचे काम आमच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात येईल.

IRCTC: या टूर पॅकेजने करा केदारनाथ-बद्रीनाथचे दर्शन, 1 जूनपासून सुरु होईल टूर

या ठिकाणांवर देता येतील भेटी

या टूर पॅकेजमध्ये प्रवासी उज्जैनचे महाकालेश्वर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, विश्वामित्री (स्टॅच्यू ऑफ युनिटी), श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि द्वारकामधील श्री द्वारकाधीश मंदिर, सोमनाथमधील श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग, साई बाबा दर्शन आणि नाशिक श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि शनी शिंगणापूर मंदिराचे दर्शन केले जातील. नंतर 31 मे रोजी ट्रेन परतेल.

किती पैसे लागणार?

तुम्हालाही प्रवास करायचा असेल तर भारत गौरव ट्रेनमध्ये तीन श्रेणींमध्ये चार्जेस ठेवण्यात आलेय. यादरम्यान स्लीपर क्लासमधील प्रवाशांना प्रति व्यक्ती 20,060 रुपये द्यावे लागतील. तर थर्ड एसी क्लाससाठी प्रति व्यक्ती शुल्क 31,800 रुपये आहे. तर सेकंड एसी क्लाससाठी 41,600 रुपये असेल. तर प्रवाशांना ट्रेनमधील श्रेणीनुसार एसी आणि विना एसी हॉटेलमध्ये राहता येईल.

ट्रेनने प्रवास करता ना? मग ट्रेन तयार करायला किती पैसे लागतात माहितीये? उत्तर जाणून व्हाल थक्क

60 टक्के ज्येष्ठांनी केलंय बुकिंग

मुकेश यांनी म्हटलंय की, ट्रेनमध्ये एकूण 1000 प्रवासी असतील. आतापर्यंत केलेल्या सर्व बुकिंगपैकी 60 टक्के वृद्धांनी केले आहेत. या यात्रेचा सर्वात जास्त फायदा वृद्धांना होणार आहे. वाढत्या वयासोबत त्यांच्या मनात तीर्थयात्रा करण्याची इच्छा असते, पण अनेकदा एकटेपणामुळे इच्छा पूर्ण होत नाही. या प्रवासादरम्यान, आयआरसीटीसी त्यांची सर्व जबाबदारी घेते. ज्यामुळे त्यांना खूप सुविधा मिळते.

बुकिंग कशी करायची?

तुम्ही IRCTC वेबसाइट www.itrccttourism.com वर जाऊन बुकिंग करू शकता. यासोबतच अधिकृत एजेंटकडून अधिकृत बुकिंग करुन घेता येते. या सोबतच, तुम्ही या मोबाईल नंबरवर 8595904074, 8595937902 कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात