मुंबई, 4 जुलै : प्रवासादरम्यान दारु पिणे किंवा दारुची बॉटल सोबत घेऊन जाणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. मात्र तरीही अनेकदा प्रवासी ट्रेनमध्ये दारु घेऊन प्रवास करतात. अशा वेळी लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, ट्रेनमध्ये दारु घेऊन प्रवास करण्याची परवानगी आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ट्रेन, प्लेन आणि कारमध्ये दारु घेऊन प्रवास करु शकता की नाही? जर तुम्ही करु शकत असाल तर तुम्ही सोबत किती दारु घेऊ शकता. प्रवासात दारु घेऊन जाण्याचे नेमके नियम काय? हे आज आपण जाणून घेऊया.
ट्रेनमध्ये अल्कोहोल घेऊन जाण्याबाबत रेल्वेचे खूप कडक नियम आहेत. रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोषी आढळल्यास शिक्षेचीही तरतूद आहे. त्याच वेळी, मेट्रो आणि फ्लाइटमध्ये दारु वाहून नेण्यास परवानगी आहे. प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगवेगळे कायदे आहेत आणि त्यानुसार तुम्ही दारू बाळगू शकता. ट्रेन, मेट्रो आणि विमानात किती दारू घेतली जाऊ शकते ते जाणून घेऊया. ट्रेनमध्ये किती दारू घेऊन जाता येते सर्वप्रथम, ट्रेनमध्ये अल्कोहोल घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. म्हणजेच तुम्ही दारू पिऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. तुम्ही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा 1989 च्या कलम 165 अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. खरंतर, रेल्वे कायदा 1989 सांगतो की, जर तुम्ही ट्रेनमध्ये, रेल्वेच्या आवारात, रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्टेशनवर मद्यपान केले किंवा दारूची बाटली घेऊन जात असाल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाईल. या कायद्यानुसार तुम्ही रेल्वेच्या मालमत्तेवर कोणतेही मादक पदार्थ घेऊ शकत नाही. तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्यास, तुम्हाला 6 महिने तुरुंगवास किंवा 500 रुपये दंड होऊ शकतो. Railway Knowledge: जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म, यातील 6 आहे भारतातील! मेट्रोमध्ये किती दारू घेऊन जाता येते दिल्ली मेट्रोच्या सर्व मार्गांवर तुम्ही दारू घेऊन जाऊ शकता. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) परवानगी दिली आहे. सध्या मेट्रोच्या आत दोन सीलबंद दारूच्या बाटल्या नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. लक्षात ठेवा दारूची बाटली घेऊन जाण्याची परवानगी आहे, पण मेट्रोमध्ये पिण्यास नाही. मेट्रो स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये मद्यपान करणाऱ्या प्रवाशांवर एक्साइज अॅक्ट आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. IRCTC देतेय स्वस्तात फिरण्याची संधी! लॉन्च केलं भुवनेश्वर, चिल्का, कोणार्कचं खास पॅकेज विमानात किती दारू घेऊन जाता येते विमानात अल्कोहोल वाहून नेण्याबाबत बोलायचे झाले तर प्रवासादरम्यान प्रवासी त्याच्या हँडबॅगमध्ये 100 मिली पर्यंत अल्कोहोल ठेवू शकतो. तसंच विमानात अल्कोहोल पिता येते का? तर कोणतीही एअरलाइन देशांतर्गत फ्लाइटमध्ये प्रवाशांना अल्कोहोल देऊ शकत नाही. मद्य देण्याची सुविधा फक्त आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये उपलब्ध आहे.