World Longest Railway Platform : भारतीय रेल्वेचा दबदबा संपूर्ण जगभरात आहे. भारतीय रेल्वे जगभरातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मचा किताबही भारताच्या नावे आहे. जगातील दहा सर्वात मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये 6 नाव भारतातील आहेत. हे स्टेशन कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला या रेल्वे स्टेशनविषयी सांगणार आहोत.
देशाच्या कानाकोपऱ्यात, भारतीय रेल्वे मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवत असते. तसेच रेल्वेच्या सर्वात मोठ्या नेटवर्कद्वारे जवळपास प्रत्येक शहराला जोडते. हे जगातील मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. चला तर मग आज जाणून घेऊया भारतातील असे सात प्लॅटफॉर्म जे रेल्वे नेटवर्कमध्ये सर्वात लांब आहेत. Railway Knowledge: भारतातील पहिली एयर कंडीशनर ट्रेन, AC नव्हता मग कोच थंड कसं ठेवायचे? इंट्रेस्टिंग आहे उत्तर जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म दक्षिण-पश्चिम रेल्वे झोनमधील हुबली रेल्वे स्टेशन आहे. यामध्ये, प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ची लांबी 1507 मीटर आहे, ज्याने जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणून आपले नाव नोंदवले आहे. सर्वात लांब प्लॅटफॉर्मवरून दोन इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या गाड्यांना एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवला जाईल. दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर भारतीय प्लॅटफॉर्म हुबळीपूर्वी गोरखपूर रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात लांब रेल्वे स्टेशन मानले जात होते. उत्तर प्रदेशचे गोरखपूर जंक्शन आता दुसऱ्या क्रमांकाचे मोठे प्लॅटफॉर्म बनले आहे. त्याची लांबी 1,366.33 मीटर आहे. यानंतर कोल्लम जंक्शन हे केरळमधील तिसरे सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. त्याची लांबी 1180.5 मीटर आहे. यानंतर खरगपूर (पश्चिम बंगाल) स्टेशनआहे, प्लॅटफॉर्मची लांबी 31072.5 मीटर आहे. Rampath Yatra: राम भक्तांसाठी IRCTC ने आणलाय खास प्लान, 13 हजारांत या तीर्थ स्थळांना द्या भेटी! पाच ते दहा नंबरवर आहेत हे स्टेशन यूएसचा शिकागो स्टेट स्ट्रीट सबवे पाचव्या क्रमांकावर आहे. प्लॅटफॉर्मची लांबी 1067 मीटर आहे. यानंतर सहावा बिलासपूर (छत्तीसगड) स्टेशन आहे, या प्लॅटफॉर्मची लांबी 802 मीटर आहे. सातवे यूकेचे शेरेटन शटल टर्मिनल फोकस्टोन, प्लॅटफॉर्मची लांबी 791 मीटर. आठवे झाशी स्टेशन, प्लॅटफॉर्मची लांबी 2526 770 मीटर. नववे पर्थ (पश्चिम ऑस्ट्रेलिया) मध्ये ईस्ट पर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मची लांबी 770 मीटर. दहावे कलगुर्ली स्टेशन (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया), प्लॅटफॉर्मची लांबी 760 मीटर.