IRCTC Tour Package: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन म्हणजे आयआरसीटीसीकडून रोजच पर्यटकांसाठी टूर पॅकेज सादर केले जाते. आता आयआरसीटीसी ने ओडिशाच्या भुवनेश्वर, चिल्का, कोणार्क आणि पुरीसाठी 5 रात्री आणि 4 दिवसांचं टूर पॅकेज आणलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिरं आणि पर्यटन स्थळांची सैर करुन आणली जाईल. IRCTC ने ट्विटद्वारे या पॅकेजची माहिती दिली आहे. या हवाई टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटक पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्य मंदिराला भेट देऊ शकतात. प्रवासादरम्यान तुम्हाला खाण्यापिण्याची आणि निवासाची काळजी करण्याची गरज नाही. IRCTC चं स्पेशल टूर पॅकेज! करुन या उटी आणि कूर्गची सैर, तिकीट फक्त… टूर पॅकेज हायलाइट्स पॅकेजचे नाव- मोहक ओडिशा - जन्माष्टमी स्पेशल (WMA51) कव्हर केलेली ठिकाणं- भुवनेश्वर, चिल्का, कोणार्क आणि पुरी टूर किती काळ असेल - 5 रात्री आणि 6 दिवस निघण्याची तारीख - 5 सप्टेंबर 2023 जेवणाचा प्लान - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण क्लास - कंफर्ट Rampath Yatra: राम भक्तांसाठी IRCTC ने आणलाय खास प्लान, 13 हजारांत या तीर्थ स्थळांना द्या भेटी! पॅकेजचा खर्च टूर पॅकेजेसच्या ऑक्यूपेंसीच्या हिशोबाने दर बदलतील. पॅकेज 33,500 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 33,500 रुपये भरावे लागतील तर दोन जण प्रवास करत असतील 34,900 रुपये प्रति व्यक्ती भरावे लागतील. एकट्याने प्रवास केल्यास 35,800 रुपये मोजावे लागतील. जर तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षांचे मूल असेल तर तुम्हाला बेडसह 30,700 रुपये द्यावे लागतील. 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बिन बेडसाठी 21,200 रुपये शुल्क आकारले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.