IRCTC Tour: राम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन राम भक्तांसाठी एक खास पॅकेज घेऊन आले आहे. या टूरमध्ये तुम्ही रामाशीसंबंधीत ठिकाणं अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, श्रृंगवेरपुर, चित्रकूट आणि जबलपूरची सैर करु शकणार आहात. तुम्हाला या टूर पॅकेजमध्ये इंट्रेस्ट असेल तर या पॅकेजविषयी खास गोष्टी जाणून घ्या.
IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हा संपूर्ण प्रवास 7 रात्री 8 दिवसांचा असेल. या संपूर्ण पॅकेजसाठी प्रति व्यक्ती भाडे रु. 12,800 पासून सुरू . हे ट्रेन टूर पॅकेज महाराष्ट्रातील पुणे स्टेशनपासून सुरू होईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळेल. या टूर पॅकेजमध्ये सर्व भाविकांना सेकंड एसी, थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल. पुण्याबरोबरच, पर्यटकांना लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव आणि भुसावळ स्टेशनवरुन बोर्डिंग/डिबोर्डिंग करता येणार आहे. IRCTC: चार धाम यात्रेला जायचंय? आयआरसीटीसीने आणलंय खास पॅकेज, पाहा कधी होतंय सुरु टूर पॅकेजच्या खास गोष्टी पॅकेजचं नाव- रामपथ यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (WZBG06) ठिकाणं- अयोध्या, नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, शृंगवरपूर, चित्रकूट आणि जबलपूर (भेडाघाट) बोर्डिंग/डिबोर्डिंग - पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव आणि भुसावळ स्टेशन टूर कालावधी- 8 दिवस/7 रात्री प्रवास मोड- रेल्वे तारीख - 13 जुलै 2023 IRCTC Tour Package: आयआरसीटीसीचं खास केरळ टूर पॅकज, 8 दिवसांची ट्रिप एकदम स्वस्तात! भाडं काय असेल? टूर पॅकेजसाठी टॅरिफ वेगवेगळा असेल. स्लीपरमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 12,800 रुपये मोजावे लागतील. थर्ड एसीमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 22,200 रुपये शुल्क भरावे लागेल. सेकंड एसी ने प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 26,500 रुपये मोजावे लागतील. बुकिंग कसे करावे IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.